-३५ कोटीचे जहाज रिल्स्, सेल्फी पॉइंटचे ठिकाण

-३५ कोटीचे जहाज रिल्स्, सेल्फी पॉइंटचे ठिकाण

Published on

-rat२p५.jpg-
२५N६७६२०
रत्नागिरी ः पाच वर्षे मिऱ्या समुद्रकिनारी अडकलेले बसरा स्टार जहाज.
----
‘बसरा स्टार’बनले रिल्स्, सेल्फी पॉइंट
पाच वर्षापूर्वी अडकले ; किनारा सुरक्षिततेबाबत यंत्रणा तोकडी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजाला आज ३ जूनला पाच वर्षे पूर्ण झाली. किनारा सुरक्षिततेच्यादृष्टीने जहाज काढण्यात शासकीय यंत्रणांचे प्रयत्न तोकडे पडल्याचे स्पष्ट झाले; परंतु ३५ कोटींचे हे महाकाय जहाज समुद्राच्या खाऱ्या पाण्याने आणि लाटांच्या माऱ्याने सडले आहे. अवघ्या २ कोटींमध्ये ते भंगारात काढले जाणार आहे; मात्र हे जहाज आता एक सेल्फी पॉईंट, रिल्स् पॉईंट आणि पर्यटन ठिकाण म्हणून पाहिले जात आहे.
बसरा स्टार जहाज ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. वादळाचा धोका वाढल्याने सुरक्षेसाठी हे जहाज समुद्रात नांगरून ठेवण्यात आले होते; मात्र अजस्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी लागले. हे जहाज काढण्यासाठी आता एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्याला ४० लाखांची कस्टम ड्यूटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये हे जहाज सडले आहे. त्याला भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
---
स्थानिकांनी सुरू केले व्यवसाय
अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचा आता पर्यटकांनी चांगला फायदा करून घेतला आहे. समाजमाध्यमांवर या जहाजासमोर अनेक रिल्स् तयार होऊन व्हायरल होत आहेत. तरुण, तरुणी, अन्य पर्यटक या सेल्फी पॉइंट म्हणून याकडे पाहत आहेत. त्याचा फायदा आता स्थानिक रहिवाशांनी घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. तिथे त्यांना नाष्टा, व्हेज, नॉनव्हेज जेवण दिले जाते. विशेष म्हणजे समोरच किनाऱ्यावर मचाण केले आहे. पर्यटक मचाणावर बसून आनंद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com