
सारस्वत समाजातर्फे
गुणवंत गौरव सोहळा
सावंतवाडी, ता. २ ः गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजबांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचे गुणपत्रक (छायाप्रत) व संपर्कासाठी आवश्यक मोबाईल क्रमांकासह आपली नोंदणी ८ जूनपर्यंत करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांनी केले आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचे वडील किंवा आई हे संस्थेचे सदस्य असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे, संतोष पई, सबनीसवाडा, सावंतवाडी या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअॅपवर पाठवावीत. गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची ही एक सशक्त साक्ष असून गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार त्यांना प्रेरणा देणारा आणि समाजासाठी अभिमानास्पद ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
....................
दोडामार्गात शुक्रवारी
शिवराज्याभिषेक दिन
दोडामार्ग, ता. २ ः फक्रोजीराव देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग येथे शिवराज्याभिषेक दिन शुक्रवारी (ता. ६) साजरा करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम व व्याख्याने आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अॅड. एस. ए. गवस, प्रा. डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे हे असणार आहेत. या कार्यक्रमास व्यवस्थापन समिती सदस्य माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक सतीश घोटगे, बांधकाम व्यावसायिक प्रवीण गोलम, संस्थेचे प्राचार्य, गटनिदेशक व सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
....................
''एसएसपीएम''मध्ये
समुपदेशन केंद्र
कणकवली, ता. २ ः येथील एसएसपीएम महाविद्यालयात अभियांत्रिकी इंजिनिअरिंग अॅडमिशन २०२५-२६ साठीचे समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. अभियांत्रिकी प्रवेशाबाबत अचूक मार्गदर्शन तसेच शासनाचे मान्यताप्राप्त डीटीई फॅसिलिटेशन सेंटर आणि विद्यार्थ्यांचं सीईटी रिझल्ट लागल्यानंतर रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची विनामूल्य सेवा या समुपदेशन केंद्रामुळे मिळणार आहे. योग्यवेळी मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. या गोष्टीचा विचार करून पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी, यासाठी या मार्गदर्शन कक्षाची स्थापना केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष (पदवी) अभियांत्रिकी कोर्सेसच्या प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध केली आहे. या मार्गदर्शन केंद्रात उच्चशिक्षित प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सज्ज असणार आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी सांगितले.
.....................
भाजप कार्यकर्त्यांतर्फे
जानवलीत स्वच्छता
कणकवली, ता. २ ः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी जानवली येथील मारुती मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या निमित्ताने कणकवली शहर मंडळतर्फे विविध सामाजिक भाजप उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, संदीप सावंत, रंजन राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सर्वेश दळवी, समीर प्रभुगावकर, सरपंच अजित पवार, किशोर राणे, सचिन पारधिये, प्रज्वल वर्दम, आशीष राणे, कीर्तीकुमार राणे, नयन दळवी, प्रसाद देसाई, सागर राणे, मकरंद सावंत, परेश सावंत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.