फणसाचे महत्व देशातच नव्हे तर जगभर पोहोचवा

फणसाचे महत्व देशातच नव्हे तर जगभर पोहोचवा

Published on

- rat३p६.jpg -
२५N६७८३७
लांजा ः खासदार नारायण राणे यांनी झापडे येथील फणस बागेला दिली भेट.

फणसाचे महत्व जगभर पोहोचवा
नारायण राणे ः झापडे येथील देसाईंच्या फणस बागेची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ ः फणसाचा विचार फक्त महाराष्ट्रात किंवा भारतापुरता न करता जगभर पोहोचवा, अशी सूचना खासदार नारायण राणे यांनी फणसकिंग हरिश्चंद्र देसाई आणि मिथिलेश देसाई यांना केली.
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या खासदार नारायण राणे यांनी रविवारी (ता. १) लांजा येथील प्रगतशील आणि युवा शेतकरी मिथिलेश देसाई यांच्या फणस बागेला सदिच्छा भेट दिली. कोकणातील फणस या पिकाबाबत करत असलेल्या कामाबाबत त्यांनी देसाई यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. लांजा येथील रहिवाशी हरिश्चंद्र देसाई यांनी झापडे गावातील शेतात ७१हून अधिक प्रकारच्या फणसाच्या झाडांची लागवड केलेली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे फणसकिंग म्हणूनच ओळखले जाते. हरिश्चंद्र देसाई व त्यांचे पुत्र मिथिलेश देसाई यांनी गेल्या काही वर्षात काजू आणि आंबा यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोकणला फणसाचे महत्व दाखवून दिले आहे तसेच भविष्यात फणसाला किती मागणी असेल व त्याचा काय उपयोग आहे, त्याचे महत्त्वही वेळोवेळी दाखवून दिले आहे. देसाई हे फणसावर करत असलेल्या नावीन्यपूर्ण कामाबद्दलची माहिती खासदार राणे यांनी वाचली होती. त्यामुळे रत्नागिरीतील कार्यक्रम संपल्यानंतर कणकवलीकडे जाताना त्यांनी देसाई यांच्या फणस बागेला भेट दिली. या वेळी सोबत निलमताई राणे होत्या. कोकणात कुणीतरी दुर्लक्षित व वाया जाणाऱ्‍या फणसपिकावर काम करत आहे, हे समजल्यामुळे इथे आले असे सांगत राणे यांनी देसाई पिता-पुत्रांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. फणसाच्या झाडांची लागवड करण्याबाबत त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. या वेळी हरिश्चंद्र देसाई यांच्या हस्ते हरिश्चंद्रा व्हरायटीचे फणसाचे कलम खासदार राणे यांना भेट देण्यात आले. या वेळी मिथिलेश देसाई यांनी कोकणातील शेतीसाठी काही मागण्यांचे निवेदन यांना दिले.
----
फणस रोपांना मागणी
झापडे येथील देसाई यांच्या फणस बागेतून दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी फणसाच्या रोपांची विक्री केली जाते. गेल्या काही कालावधीत फणसाचा रोपांच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यांच्या बागेतील फणसाच्या झाडांची पाने निर्यात करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com