चिपळूणमधील खाऊगल्लीतील अतिक्रमणे हटवली
-ratchl४४.jpg-
२५N६८११८
चिपळूण ः अनधिकृत शेड काढताना पालिकेचे कर्मचारी.
--------
चिपळूणमधील खाऊगल्ली अतिक्रमण मुक्त
पालिका प्रशासनाकडून साहित्य जप्त : एकावर कायदेशीर कारवाईचा बडगा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः पालिका प्रशासनाने शहरातील मार्कंडी स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल बायपास रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या खाऊगल्लीच्या ठिकाणी विक्रेत्याने केलेले अतिक्रमण हटवत जोरदार दणका दिला याशिवाय संबंधित खोकेधारकाचे साहित्य जप्त केले आहे. रस्ता खोदून उभारलेल्या शेडप्रकरणी पालिकेने गोवळकोट येथील शोएब मुकादम याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील खाद्यपदार्थांच्या गाड्या पालिकेने हटवून संबंधित विक्रेत्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. ही जागा नव्याने झालेल्या बायपास मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला येथे अत्यंत कमी संख्येने खाद्यपदार्थ विक्रेते होते; मात्र आता वर्षभराच्या कालावधीत ही संख्या सुमारे ५०हून अधिक झाली आहे. परिणामी, काही विक्रेत्यांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. दिलेल्या जागेपेक्षा ज्यादा जागेचा वापर तसेच रस्त्याच्या बाजूला आखून दिलेल्या पट्ट्याच्या बाहेर विक्रेत्यांनी शेड उभी करण्यास सुरुवात केली. पावसाळ्यात अतिक्रमणाचा गैरफायदा घेण्यासाठी काहींनी डांबरी रस्त्यावर खड्डे खोदून पक्के स्टीलचे बार लावून शेड उभ्या केल्या. अनेक व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेलाच ग्राहकांसाठी खुर्च्या मांडून वाहतूक धोकादायक व अडथळा होईल, अशा पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवले आहेत. काहीवेळा या ठिकाणी छोटे अपघातदेखील झाले आहेत. या सर्व गोष्टींच्या तक्रारी पालिकेकडे झाल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली. संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल्स पट्ट्याच्या मागे नेण्यात आले. रस्ता खोदून शेड उभी केली त्या गोवळकोट येथील शोएब मुकादम याच्यावर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.
कारवाईत यांनी घेतला सहभाग...
या कारवाईत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक महेश जाधव, अग्नीशमन अधिकारी आनंद बामणे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, बापू साडविलकर, अमोल वीर, संदेश टोपरे, सचिन शिंदे आदी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.