फळ पीक नुकसानाची भरपाई द्या

फळ पीक नुकसानाची भरपाई द्या

Published on

68132

फळ पीक नुकसानीची भरपाई द्या

ठाकरे शिवसेनेची मागणी ः सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकम पिकासह विविध फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकम पीक शंभर टक्के वाया गेले आहे. झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी आज ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह राजन तेली, परशुराम उपरकर, सतीश सावंत, अमरसेन सावंत, सुशांत नाईक आदी पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेत शेतकऱ्यांना भेडसावत असणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. यामध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मे पासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरे, गोठे जमीनदोस्त झाले आहेत. कोकम पिकासह जांभूळ, फणस व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकम पीक शंभर टक्के वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. कोकम पीक हे एकत्रित क्षेत्रात नसल्याने या पिकाच्या नुकसानीसाठी झाडांची संख्या मोजून पंचनामे करावेत. हे पंचनामे तत्काळ करण्याबाबत आपण तत्काळ सूचना द्याव्यात. तसेच पावसामुळे शेतीचे बांध वाहून गेले आहेत. त्यांचीही नुकसानभरपाई मिळावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक रस्त्यांची कामे ठेकेदारांनी अर्धवट ठेवली आहेत. त्यामुळे अनेक रस्ते चिखलमय झाले असून वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू आहे. बोगस कर्मचारी दाखवून आर्थिक अपहार केला जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या संख्येने दाखवून प्रत्यक्षात कमी कर्मचारी कार्यरत आहेत, असा आरोप करत याबाबत लक्ष द्यावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
..................
जिल्हाधिकाऱ्यांचे अधिष्ठातांना आदेश
यावर जिल्हाधिकारी पाटील यांनी तत्काळ वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधून ठाकरे शिवसेनेने केलेल्या तक्रारींबाबत माहिती घेतली. वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिल्यानंतर सर्व कर्मचारी दिसून आले नसतील तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे चुकीचा कारभार सुरू असेल तर तत्काळ थांबवा, असे आदेश यावेळी अधिष्ठाता यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com