गुहागर-विजापूर मार्ग वाहतुकिला बनतोय धोकादायक

गुहागर-विजापूर मार्ग वाहतुकिला बनतोय धोकादायक

Published on

- ratchl५१.jpg, ratchl५२.jpg-
२५N६८२७७, २५N६८२७८
चिपळूण ः कोंढे बौद्धवाडीसमोर मोरीवर पडलेले खड्डे तर दुसऱ्या छायाचित्रात कोंढे-कळवंडे रस्त्यावरील लोखंडी जाळी वर आल्याने निर्माण झोलेली धोकादायक परिस्थिती.
---
गुहागर-विजापूर मार्ग बनतोय धोकादायक
स्थानिकांमध्ये नाराजी; मोरी खचली, खड्डे पडले, जाळ्या उखडल्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोंढे-बौद्धवाडीसमोर मोरी दोन्ही बाजूंनी खचली आहे. तेथे दोन मोठे खड्डे पडले आहेत तर कोंढे-कळवंडे मार्गावरील रिगल कॉलेज परिसरात रस्त्यावरची लोखंडी जाळी वर आल्यामुळे वाहने चालवणे धोकादायक बनलेले आहे शिवाय पादचाऱ्यांनाही त्याचा धोका निर्माण झाला असल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झालेले आहेत.
तालुक्यातील कोंढे-बौद्धवाडी येथून वाहणारा वाघपऱ्या काही अंतरावर असणाऱ्या मुख्य नदीला जाऊन मिळतो. याच परिसरातून गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने त्या ठिकाणी मोरी ठेवण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी ही मोरी खचण्याचा प्रकार घडला होता. तेथे एका वाहनाचा अपघात होऊन त्या मोरीची दूरवस्था झालेली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या मोरीची दुरूस्तीही केली होती; मात्र अलिकडच्या काही दिवसात ही मोरी दोन्ही बाजूंनी पुन्हा खचली तसेच त्या परिसरात दोन मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांची रूंदी वाढून या मार्गावरची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. मुळातच गुहागर पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावरून पर्यटकांसह एसटी बसेस, ट्रक व काही मोठ्या कंपन्यांमुळे मोठे ट्रक अशी शेकडो वाहने दररोज धावतात. त्यामुळे मोरी आणखी खचून तसेच खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पाऊस पडत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने मोरीचे काम हाती घेऊन ते तातडीने मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याच भागापासून काही अंतरावर असणाऱ्या रिगल कॉलेज येथील कोंढे-कळंवडे रस्त्यावरही सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या मार्गावर गटार ठेवण्यात आले आहे. त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली होती; मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.

----
कोट
हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अखत्यारित आहे. त्या परिसरातील लोखंडी जाळी वर आल्यामुळे अपघाताचीही शक्यता आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने दुरूस्ती करावी.
- तुषार करंजकर, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com