मारळ येथील मोठा खड्डा ठरतोय अपघाताला कारण
- rat५p३.jpg-
२५N६८२२६
संगमेश्वर ः येथील मारळ रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा.
मारळ येथील रस्त्यावर मोठा खड्डा
अपघाताला निमंत्रण; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः देवरूख- मार्लेश्वर मार्गावरील मारळ येथे भलामोठा खड्डा पडला असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हा खड्डा भरणे अत्यंत आवश्यक असून, त्याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांसह स्थानिकांमधून होत आहे.
सह्याद्रीच्या कडेकपारीत मारळ नगरीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मार्लेश्वर देवस्थान आहे. महादेवाच्या दर्शनासाठी तसे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविक, पर्यटकांची पावले तीर्थक्षेत्री वळू लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी मारळ ते मार्लेश्वर या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. जानेवारी महिन्यात तीर्थक्षेत्री मकरसंक्रांतच्या दिवशी आंगवली श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा थाटात झाला. यात्रेपूर्वी दोन दिवस अगोदर मारळ येथील मोरीवर अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचा साज चढवला. या दरम्यान वाहनांची ये-जा सुरूच होती. वाहने थांबवणेही शक्य नव्हते. वास्तविक हे काम त्यापूर्वीच करणे गरजेचे होते. परिणामी, पावसामुळे मोरीजवळील रस्त्यावर केलेला डांबरीकरणाचा साज वाहून गेला आहे. तिथे पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने भाविक, पर्यटकांना वाहने चालवताना अंदाज येत नाही. दोन दिवसांपूर्वी या खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात झाला. सुदैवाने, कोणालाही दुखापत झाली नाही.
पावसाळ्यात उंचावरून कोसळणारा धबधबा, गर्द झाडी, फेसाळपणे वाहणारी नदी, थंडगार हवा याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या तीर्थक्षेत्री ये-जा करत आहेत. त्यांना मारळ हा मोठा खड्डा त्रासदायक ठरतो. त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकडे संबंधित ठेकेदारासह बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.