सिंधुदुर्गात सात ठिकाणी ''सुरंगी वन'' विकसित करणार
swt५१५.jpg
६८२९८
निरवडेः येथील वन विभागाच्या नर्सरीमध्ये आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड करताना उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी. सोबत वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल पृथ्वीराज प्रताप, निरवडे सरपंच सुहानी गावडे, सचिन रेडकर व अन्य मान्यवर.
सिंधुदुर्गात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार
उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डीः पर्यावरण दिनानिमित्त निरवडेत वृक्ष लागवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः जिल्ह्यात सात ठिकाणी सुरंगी वन विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही आवश्यक असलेल्या जागा निश्चित केल्या आहेत. दुर्मिळ असलेल्या सुरंगीचे जतन व्हावे आणि पुढच्या पिढीला त्याचा फायदा व्हावा यासाठी या उपक्रमांतर्गत २ हजार ६०० झाडे लावण्याचा संकल्प वनविभागाकडून केला आहे. यात ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालयांना सामावून घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जाईल, अशी माहिती सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी आज येथे दिली. दुर्मिळ प्राण्यांसाठी जसा सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे दुर्मिळ वनस्पती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्या वनस्पतींचा अभ्यास आणि जतन होणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ सावंतवाडी वन विभाग व निरवडे ग्रामपंचायत यांच्यावतीने आज निरवडे येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरंगीचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक वैभव बोराटे, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरी, अतुल पाटील, वैशाली पवार, गोपाळ सावंत, चंद्रकांत पडते, रामदास जंगले, निरवडे सरपंच सौ. सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सचिन रेडकर, रामचंद्र कुडाळकर, अमोल टेंबकर, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, रुपेश हिराप, निखिल माळकर, नरेंद्र देशपांडे, ओम टेंबकर, भुवन नाईक, सुभाष परुळेकर, हरी वारंग, दादा गावडे, सुहास पाटील, बाळा सावंत, नागेश गावडे, यशवंत पांढरे, संजय तानावडे, सुधीर माळकर, रेश्मा पांढरे, साक्षी भाईडकर, सुभद्रा कुबल, सुनिता भाईडकर, सुजाता जाधव, पूर्वा बागकर आदी उपस्थित होते.
श्री. रेड्डी पुढे म्हणाले, "राज्याच्या माध्यमातून राज्यात ''सुरंगी वने'' विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वनराज्यमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. दुर्मिळ अशी मानली जाणारी सुरंगी नष्ट होत आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला त्याचे ज्ञान व्हावे, जतन व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात सुरंगी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सात ठिकाणी खास सुरंगी वने विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी काही स्थळे निवडण्यात आली आहेत. लवकर त्या ठिकाणी ही झाडे लावण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सिंधुदुर्गातून सावंतवाडीत केला आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हीही निश्चित प्रयत्न करू."
निरवडे सरपंच सौ. गावडे यांनी जिल्ह्यात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. परंतु, त्यानंतर त्या झाडाकडे कोणीच पाहत नाही. या ठिकाणी अनेक लोक आपल्या जमिनी विकत आहेत, प्लॉटिंग करत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांचा नाश होत आहे. परंतु, ही परिस्थिती बदलणे काळाची गरज आहे; अन्यथा वृक्ष नसतील तर त्याचा मोठा फटका पुढच्या पिढीला भोगावे लागेल. त्यामुळे सर्वांनी वृक्ष लागवड करण्यासाठी आणि जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र पवार तर आभार सचिन रेडकर यांनी मानले.
चौकट
रोजगार देणार वृक्ष
आगामी काळात १५ ते २० वर्षात जास्तीत जास्त जिल्ह्यात सुरंगीचे वृक्ष व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सुरंगी हा वृक्ष अनेकांना रोजगार देणारा आहे. गजरा किंवा देवासाठी याची फुले वापरली जातात तसेच ती सुकल्यानंतर अत्तर बनवता येतो. त्यामुळे या फुलांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक स्त्रोत निर्माण होतो तर दुसरीकडे निसर्ग संवर्धन होते. त्यामुळे जास्तीत जास्त अशा वृक्षाची लागवड होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे उपवनसंरक्षक रेड्डी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.