बाळ माने यांची उबाठाच्या उपनेतेपदी नियुक्ती
-rat५p१९.jpg-
२५N६८३२५
रत्नागिरी ः बाळ माने यांची उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले.
------
ठाकरे शिवसेनेच्या उपनेतेपदी
बाळ माने यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माने यांचा शिवसेनेतील मान वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीत राजकीय उलथापालथ होऊन भाजपचे निष्ठावंत आणि माजी आमदार बाळ माने यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर वजन वापरून रत्नागिरी विधानसभा मतदार संघाची राजकीय परिस्थिती विषद केल्यानंतर मातोश्रीने बाळ माने यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे तिकीट दिले; परंतु त्यांचा पराभव झाला. बालेकिल्ल्यातच उबाठाचे पानिपत झाले. कोकणात भास्कर जाधव वगळता एकही आमदार निवडून आला नाही. उद्धव ठाकरे यांच्या हा पराभव जिव्हारी लागला. माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी आहे. आता मातोश्रीने बाळ माने यांना उपनेतेपद दिले आहे. त्यामुळे माने यांचा शिवसेनेतील मान वाढला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर खासदार राऊत यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर, चंद्रकांत शिंदे, समन्वयक परवेश घारे, रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, कमलाकर कदम, सुरेश करंबेळे, विजय देसाई आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.