एक्सल इंडस्ट्रीजतर्फे वृक्षारोपण
- rat६p१०.jpg-
२५N६८४९२
लोटे ः परशुराम औद्योगिक वसाहतीमधील एक्सल इंडस्ट्रीजच्यावतीने जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण करताना मान्यवर.
एक्सल इंडस्ट्रीजतर्फे वृक्षारोपण
पर्यावरणदिन; कापडी पिशव्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील एक्सल इंडस्ट्रीजतर्फे जागतिक पर्यावरणदिनानिमित्त खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप आणि तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पर्यावरणाला घातक असणारे प्लास्टिक हद्दपार करण्याच्या उद्देशाने कापडी पिशव्यांचे वाटप कंपनीतर्फे करण्यात आले.
कारखान्यातर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप आणि तहसीलदार सुधीर सोनवणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे पंकज गोसावी, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड, लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, एक्सेल इंडस्ट्रीजचे श्रीपाद देशपांडे, गजानन देशपांडे, एच. आर. हेड आनंद पाटणकर, सरपंच चंद्रकांत चाळके, भरत बजागे आदी उपस्थित होते. लोटे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधील अपघात किंवा आग लागण्याच्या घटनांवेळी कायम तत्पर आणि अग्रेसर असणारी एक्सेल इंडस्ट्री सुरक्षा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी सरपंच चंद्रकांत चाळके म्हणाले, एक्सेल इंडस्ट्रीज हा कारखाना पर्यावरण संवर्धनाबाबत कायमच जागरूक आहे. त्यांच्याकडून नेहमी पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.