पालिका लावणार 25 हजार झाडे
- rat६p३.jpg-
२५N६८४८५
रत्नागिरी- जागतिक पर्यावरणदिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण करताना मुख्याधिकारी वैभव गारवे. सोबत कर्मचारीवर्ग.
---
रत्नागिरी पालिका लावणार २५ हजार झाडे
मुख्याधिकारी वैभव गारवे ः ‘एक पेड मेरे माँ के नाम’ संकल्पना राबवणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. कारण, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी केंद्र शासनाने जनतेच्या खांद्यावर वृक्षलागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माँ के नाम’ ही संकल्पना राबवण्याचा निर्धार सोडला आहे. त्यानुसार रत्नागिरी पालिकेने शहरात २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.
‘एक पेड मेरे माँ के नाम’, केंद्र शासनाच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल विभागाने देशात नवीन योजना सुरू केली आहे. भारताची लोकसंख्या १४० कोटी असताना तेवढीच झाडे लागावीत यासाठी ‘एक पेड मेरे माँ के नाम’ याला वृक्ष रोपवनाशी जोडलेले आहे. देशातील सर्व विभाग, स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी केले जात आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्याकरिता पडीक जमिनीत वृक्ष लागवड झाल्यास रोपवनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरणदिनानिमित्त रत्नागिरी पालिकेतर्फे अमृत २.० माझी वसुंधरा व DAY-NULM यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम गुरूवारी (ता. ५) आनंदनगर येथे करण्यात आला. या वेळी एक पेड माँ के नाम या शासनाच्या उपक्रमाचा प्रारंभ रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या उपक्रमांतर्गत २५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती गारवे यांनी दिली. या प्रसंगी अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर, समूह संघटक सारिका मिरकर, रत्नागिरी नगर पालिकेच्या सर्व सीआरपी व बचतगटातील महिला उपस्थित होत्या.
---
पडीक जमिनीचा वापर
पर्यावरणाचा समतोल साधण्याकरिता जिल्ह्यातील पडीक जमिनीत वृक्ष लागवड केल्यास रोपवनाचे उद्दीष्टपूर्ण होणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा पडीक जमिनीवर वृक्षलागवड करावी असे आवाहनही निसर्ग प्रेमींच्यातून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.