सुजाण नागरिक बनवणं शिक्षकांची जबाबदारी
- rat६p६.jpg -
२५N६८४८८
रत्नागिरी ः वरिष्ठ श्रेणी शिक्षकांच्या प्रशिक्षणावेळी मार्गदर्शन करताना प्रा. सागर पोकळे.
-----
विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनवा
प्रा. सागर पोकळे ः वरिष्ठ श्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः एकविसावे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात आत्ताच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील सक्षम नागरिक बनणे गरजेचे आहे. ही जबाबदारी शाळा आणि पर्यायाने शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन प्रा. सागर पोकळे यांनी केले.
ते रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणात ''एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये ''या विषयावर बोलत होते. या वेळी ते म्हणाले, विद्यार्थ्यांना चिकित्सक विचारकौशल्य, सर्जनशील विचारकौशल्य, सहयोग कौशल्य, संप्रेषण कौशल्य, माहिती साक्षरता, मध्यम साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता, लवचिक आणि अनुकूलता, नेतृत्व आणि जबाबदारी, पुढाकार आणि स्वःदिशा, उत्पादकता, सामाजिक आणि बहुसांस्कृतिक संवाद आदी कौशल्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापनात शिकवायला हवीत. तरच एकविसाव्या शतकासाठी सक्षम पिढी बाहेर पडेल, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना वर्गात स्वतःचे मत, विचार, कल्पना मोकळेपणाने वर्गात मांडण्याचे स्वातंत्र्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अध्ययन अनुभव द्यावेत, विद्यार्थ्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित करावी व विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन द्या, असेही आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी येथे सुरू असलेले प्रशिक्षण हे डाएटचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर, राहुल बर्वे, राजेंद्र लठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अश्विनी काणे या साधनव्यक्ती म्हणून काम पाहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.