अभ्यासाच्या क्षेत्रांचा विस्तार होणे गरजेचे

अभ्यासाच्या क्षेत्रांचा विस्तार होणे गरजेचे

Published on

swt62.jpg
68524
कुडाळः येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला.

अभ्यासाच्या क्षेत्रांचा विस्तार होणे गरजेचे
प्रफुल्ल वालावलकरः कुडाळात मानवाधिकार वेल्फेअरतर्फे गुणवतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ः शालेय जीवनात मिळालेले यश प्रेरणादायी असते. मात्र, पुढील आयुष्यात आपल्याला जास्तीत जास्त यशोशिखरे पादाक्रांत करावयाची असतील तर आपल्या अभ्यासाची क्षेत्रे विस्तारित करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्ही जीवनात हमखास यश मिळवाल, असा सल्ला कुडाळ पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा कुडाळ येथे आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर कुडाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती आर. के सावंत, जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, सचिव विनोद जाधव, महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब,  जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा. रूपेश पाटील, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, मनोज वारे, मनोज तोरसकर, अमित देसाई, संजय पालव, नामदेव जानकर, कवी दीपक पटेकर, नितीन शिरोडकर, साबाजी परब, पार्वती वेंगुर्लेकर, कोमल पारकर, रमा खानोलकर, छाया सावंत, सिध्दी पारकर, दर्शना मेस्त्री, सानिका परब, धनश्री सडवेलकर आदी उपस्थित होते.
श्री. वालावलकर  म्हणाले, ‘‘आयुष्यात कोणतेही क्षेत्र करिअर म्हणून निवडताना काळजीपूर्वक निवडा. केवळ पुस्तकी किडा बनून राहू नका. कारण बऱ्याच गोष्टी पुस्तकाच्या बाहेरही असतात, ज्या आपल्या जीवनाला एक चांगली दिशा देऊ शकतात.’’
महिला जिल्हाध्यक्षा परब यांनी संघटनेचे कार्य विषद करून संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या विविध विधायक कार्य आणि उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे सचिव दीपक पटेकर यांचा सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्यावतीने रेश्मा पालव हिने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद धुरी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी तर आभार सचिव विनोद जाधव यांनी मानले.

चौकट
स्पर्धा परीक्षांची कास धरा
श्री. सावंत यांनी आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना योग्य दिशा देण्यासाठी चांगले मार्गदर्शकांची कमतरता आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही आपले विद्यार्थी भरकटत जातात. माध्यमिक स्तरावर मिळवलेले यश पुढे कायम टिकवण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांची कास धरणे आवश्यक असल्याचेही नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com