तळगाव मेट्रोपोलिटनमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती

तळगाव मेट्रोपोलिटनमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती

Published on

wt613.jpg
68581
तळगाव ः येथील मेट्रोपॉलिटन इन्टिट्यूटमध्ये पर्यावरण दिनानिमित्त कंपोस्ट खत तयार करण्यात आले.

तळगाव मेट्रोपोलिटनमध्ये
कंपोस्ट खताची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत तळगाव (ता.मालवण) येथील मेट्रोपॉलिटन इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंटच्यावतीने सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या मुलांकडून खड्डे बनवून कंपोस्ट खत तयार करून घेण्यात आले.
प्रदूषण, हवामान बदल आणि जंगलतोड यासारख्या पर्यावरण समस्येबाबत जागृकता निर्माण व्हावी, यासाठी मेट्रोपॉलिटन इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेन‌मेंटच्यावतीने सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या मुलांकडून खड्डे बनवून कंपोस्ट खत तयार करून घेण्यात आले. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या मुलांकडून खड्डे बनवून त्यात परिसरातील पालाद्याचोळा, शेणखत इत्यादी टाकण्यात आला. निसर्गाला कोणतेही हानी होऊ नये यासाठी कंपोस्ट खत तसेच जीवामृत तयार केले गेले. यामध्ये मुलांचा, कर्मचारी वर्ग, संस्थापक यांचा समावेश होता. संस्थापक विनोद कदम, वृषाली कदम, सिव्हिल विभाग प्रमुख सिद्धार्थ जाधव, गार्डन सुपरवायझर भाग्यलक्ष्मी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. तयार करण्यात आलेल्या एका खड्ड्यात ५०० किलो खत तयार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com