घेरा यशवंतगडचे बांधकाम कोसळल्याने नाराजी
-rat६p३९.jpg-
P२५N६८६४७
राजापूर ः घेरा यशवंतगड किल्ल्याच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना पुरातत्त्व विभागाचे अभियंते.
---
घेरा यशवंतगडच्या बांधकामाची पाहणी
पुरातत्त्व विभागाचे पथक दाखल ; नागरिकांकडून धारेवर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ : तालुक्यातील नाटे येथील किल्ले घेरा यशवंतगड किल्ल्याच्या जतन-संवर्धनासह सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. असे असताना भरपावसामध्ये किल्ल्याचे बांधकाम कोसळल्याने शिवप्रेमींसह नाटे, साखरीनाटे आणि परिसरातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभागाचे अभियंता विशाल भरसट यांनी आज कोसळलेल्या बांधकामाची पाहणी केली.
या वेळी किल्ल्याच्या बांधकामाविषयी चर्चा करताना उपस्थिती शिवप्रेमी अन् ग्रामस्थांनी पडझड होताना त्या ठिकाणी जर पर्यटक असते आणि एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? असा थेट सवाल उपस्थित केला. तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड ऐतिहासिक किल्ला असून, इथे वर्षभरातून अनेक पर्यटक येत असतात. पुरातत्त्व विभागामार्फत या किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र, या किल्ल्याच्या जुन्या बांधकामाचा काही भाग पावसामुळे ढासळल्याबाबत शिवप्रेमींसह या परिसरातील गावांमधील ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभागाचे अभियंता भरसट यांनी आज नाटे येथे किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याच्या कोसळलेल्या बांधकामाची पाहणी केली.
या वेळी नाटेचे सरपंच संदीप बांदकर, ग्रामपंचायत सदस्य नीलेश बांदकर, शिवप्रेमी शरद घरकर, साखरीनाटे ग्रामपंचायत सदस्य मजीद सायेकर, पिंट्या कोठारकर, बाळा कुबडे, संतोष चव्हाण, देवेंद्र बांदकर, प्रसाद मोदी, सुवर्णा बांदकर, मनाली करंजवकर, सचिन बांदकर, सिद्धेश मराठे आदी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.