-विमान कळकावर सावरलं
गावच्या मालका .........लोगो
(२५ मे पान ६)
विमान कळकावर सावरलं
हा किस्सा आहे खूप जुना, ज्या वेळी फक्त तालुक्याच्या ठिकाणी बॅंक असायची मग गावोगावी सरकारमान्य वा अनधिकृत सावकार असायचे. त्याचे व्याज असे आण्याचे. म्हणजे दरसाल दर शेकडा नव्हे हो तर दरमहिना दर शेकडा. अडलानडला घ्यायचे पैसे त्या सावकाराकडून काय करणार? अडला हरी गाढवाचे पाय धरी तशातली गत. आजही खूप वाड्यावस्त्यांतून सार्वजनिक फंड आहेत अन् त्यांचेही महिन्याचे व्याज १० ते १२ टक्के असते. असाच एक आमच्या भागात एक सावकार होता, त्याचे नाव होते बाउद्दीन; पण तो सावकार शर्टला सोन्याची बटणे वापरायचा म्हणून तो ‘बटणेवाला बाऊ’ म्हणून प्रसिद्ध होता. सावकारच तो त्यामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम. त्याचा एक मुलगा पायलट होता. एके दिवशी दशक्रोशीत बातमी आली की, बटणेवाल्या बाऊच्या मुलाचे विमान अपघातग्रस्त झाले अन् पायलट म्हणजे बाऊचा मुलगा बेपत्ता आहे. तर झालं काय? आमच्या घरी एक ब्रिटिश आर्मीतील निवृत्त सैनिक आला होता तर तो आमच्या आजोबांना या विमान अपघाताची माहिती देत होता कशी, ते त्याच्याच शब्दात...
rat७p७.jpg-
P25N68772
---अप्पा पाध्ये गोळवलकर, धामणी
----------
तात्यानू, बटणेवाल्याचा पॉर (पोरगा) इमान कंपनीत व्हता. गुदस्ता लगन क्येलान न्हवं बाऊन त्याचं ता पोर...इमान उडवायचा ता येयाचा व्हता, पर काय त्येचा नशीब फुटला का इस्वराचा कोप झाला तं ठावं नाय पर त्येचा इमान कोसललं. बाऊला तार ना वो आली, वाचलान बाऊन ना लागलीच देवौकातली टुरिंग गाडी क्येलान ना गेला तिकडं उंबईच्या म्होरं. इमान कोसललं हं बरोबर, पर पडलं व्हतं किर्र रानात, त्या रानात वाग (वाघ) मोप (भरपूर), तवा कोन रानात शिरेना. मंग बाऊनं सरकारात ज्यास्ती रुपये भरलान, मंग काय इच्यारता? सरकार शिरलं रानात. जवलजवल हजारेक सोजीरं (सोल्जर्स) व्हती हत्यारं घेन. कोनशी बंदूक तर कोनाशी तरवार, सगली सोजीरं हत्यारबंद. बाऊला सरकारनं बंगल्यात ठेवलान व्हता. दोन दिस झाले, च्यार दिस झाले पर इमान काय नदरेला (नजर) दिसना. मंग आठव्या दिशी इमान दिसलं, अवो रान इत्कं गच्च ना की दोंपारच्या बाराची किरना बी जमिनीवर पडायची नाय. झाडां लय उंच. तर झालं व्हतं काय इमान कोसललं ते त्या रानातल्या कलकीच्या बेटीवर थावारलं (सावरलं) व्हतं; सोदता सोदता दिसलं कसं ठावं हाय, सांजची किरना पडली ना इमानावर तवा ते चमाकलं म्हनू उमागलं. पर सावकाराचा पोर मातर आकासपाताल एक क्येलान सरकारनं पर नायच गावला. मग बटनेवाला बाऊ आला मांगं, पर त्याची शाप रयाच ग्येली वो, त्येला अन्न ग्वाड लागेना. खुल्या सारका करी हो ता, शेवट परवां म्येला हो, ता आमी नव्हं ग्येलीला व्हतो मूठमातीला. काय मानूस व्हतं मयताला. वाव (जागा) नाय कब्रस्तानात. बाऊचं घर बसलं वो अता.
विमान कळकावर सावरलं हे ऐकून माझ्या बालमनावर कळकं हे केव्हढेतरी अवाढव्य झाड असावे, असा समज पुढे कितीतरी वर्षे कायम होता.
(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.