बदलती जीवनशैली
-rat६p४२.jpg-
P२५N६८६६९
रत्नागिरी ः पत्रकार परिषदेत बोलताना यकृतज्ज्ञ आणि सर्जन डॉ. आदित्य कुटे आणि डॉ. समृद्धी पोहेकर.
--
बदलती जीवनशैली यकृतासाठी धोकादायक
डॉ. आदित्य कुंटे ः व्यायामासह संतुलित आहार घ्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : यकृताचे आजार हे व्यसनापेक्षा बदलत्या जीवनशैलीमुळे अधिक वाढत आहेत. ४० ते ५० टक्के लोकांमध्ये त्याचे प्रमाण दिसत आहे. रत्नागिरीत आम्ही परकार हॉस्पिटलमध्ये यकृतावरील आजारावर उपचार करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. लिव्हर ट्रान्सप्लांटदेखील केली जाते; परंतु ती सुविधा मुंबईमध्ये आहे. त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हाच यावरील उपचार आहे, अशी माहिती मुंबई येथील ग्लेनिगल्स रुग्णालयाचे यकृतज्ज्ञ आणि सर्जन डॉ. आदित्य कुटे आणि डॉ. समृद्धी पोहेकर यांनी दिली.
हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी यकृताचे आजार का वाढू लागले आहेत, या विषयी डॉ. आदित्य कुंटे आणि डॉ. समृद्धी पोहेकर यांनी कारणमीमांसा केली. ते म्हणाले, व्यसनाबरोबरच बदलती जीवनशैली ही यकृतासाठी धोक्याची घंटा आहे. या कारणांमुळे सध्या ४० ते ५० टक्के लोकांमध्ये यकृताचे आजार वाढू लागले.
तीव्र मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, अनुवांशिकता, हिपॅटायटीस बी किंवा सी, मद्यपान आदी कारणांमुळे यकृतावर चरबी जमा होते. यातून ‘फॅटी लिव्हर’चा धोका उद्भवतो. बदलत्या जीवनशैलीतील चुकीचा किंवा अधिक गोड, चरबीयुक्त आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे यकृतात चरबी साठल्याने ‘फॅटी लिव्हर’चे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर वेळीच तपासणी केल्यास यकृताचे आरोग्य चांगल्या प्रकारे राखता येते. त्यासाठी आहार आणि व्यायामाची नितांत गरज आहे .
काही वेळा औषधोपचारानेही ‘फॅटी लिव्हर’ पूर्वस्थितीत आणता येतो. मात्र, त्यासाठी योग्य वेळी तपासणी आणि निदान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यकृताच्या आजारावरील तपासणी सुविधा रत्नागिरीत नसल्याने रुग्णांना मुंबई - पुणे येथे जावे लागत होते; मात्र, आता येथील परकार रुग्णालयात यकृतज्ज्ञ डॉ. अनिल तांबे, डॉ. आदित्य कुंटे आणि डॉ. समृद्धी पोहेकर या बाह्य कक्षात तपासणीसाठी महिन्यातून एकदा येणार आहेत.
---
‘लिव्हर ट्रान्सप्लांट’ची सुविधा
योग्य वेळेत उपचार न झाल्यास यकृत खराब होऊन त्याचे कार्य विस्कळित होते. अशा परिस्थितीत आता आधुनिक तंत्रज्ञानाने ‘लिव्हर ट्रान्सप्लांट’ सारखी सुविधाही उपलब्ध झाली आहे. अगदी लहान मुलांपासून ७५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीवरही अशी शस्त्रक्रिया करता येते. या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च होत असला तरी काही धर्मादाय संस्थांच्या सहकार्याने आर्थिक दुर्बल घटकांनाही आर्थिक मदत मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.