स्वतःला ओळखा, क्षेत्र निवडा उत्तम कामगिरी करा

स्वतःला ओळखा, क्षेत्र निवडा उत्तम कामगिरी करा

Published on

-rat८p१५.jpg-
P२५N६९०६१
रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले. या विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.
----------
स्वतःला ओळखा, क्षेत्र निवडा उत्तम कामगिरी करा
पायल घोसाळकर ः क्षत्रिय मराठा मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात जेव्हा आपण हजार तासांचा कठोर सराव करतो, तेव्हा त्यात पारंगत होतो. स्वतःला ओळखा, त्यानुसार क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असं कार्य करून दाखवा. आपण एखाद्या क्षेत्रात पडल्याशिवाय विश्वास ठेवू नका. क्षत्रिय मराठा मंडळ, मराठा बिझनेसमन फोरमचे कार्य मराठा समाजासाठी फायदेशीर आहे, असे प्रतिपादन बिहार सरकारच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापन युनिटमधील विकास अभ्यासक पायल घोसाळकर यांनी केले.
रत्नागिरीत क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉल येथे करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे, प्रचार प्रमुख संतोष तावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, खजिनदार जितेंद्र विचारे आणि विजय पाटील उपस्थित होते. अध्यक्ष सुर्वे म्हणाले की, भारत महासत्ता होत असताना मराठा समाजानेही तितकेच योगदान दिले पाहिजे. नोकरीपेक्षा उद्योजक व्हावे, त्याकरिता मराठा बिझनेसमन फोरम काम करत आहे. स्पर्धा परीक्षा देण्याकरिता मार्गदर्शन सुरू करण्यात येणार आहे. परदेशात शिक्षण घेतले तरी भारतामध्ये परत येऊन देशाची सेवा करायची आहे, हे ध्यानात ठेवा.

चौकट
स्थापनेपासून गुणवंतांचा गौरव
२००८ ला मंडळाच्या स्थापनेपासून हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मारुती मंदिर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची नित्य पूजा केली जाते. तेथे दर महिन्याच्या एक तारखेला क्षत्रिय मराठा मंडळातर्फे पूजा केली जाते. वृक्षारोपण, मराठा बिझनेसमन फोरमतर्फे दरमहा बैठक, मंडळाचा वर्धापनदिन असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये मराठा समाजातील बंधू-भगिनींनी आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन संतोष तावडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com