गड किल्ले संवर्धन संस्थेतर्फे रायगडावर स्वच्छता मोहिम
- rat९p५.jpg-
२५N६९२८५
रायगड ः येथील किल्ल्यावर स्वच्छतामोहीम करणारे गडकिल्ले संवर्धन संस्थेचे पथक.
रायगड किल्ल्यावर स्वच्छतामोहीम
‘गडकिल्ले संस्थे’चा पुढाकार ; सलग पाच वर्षे उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. ९ ः रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याची सांगता झाल्यावर ''गडकिल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने रायगडावरील होळीचा माळ, जगदिश्वर मंदिर परिसर, टकमक टोक, राजवाडा, नागारखणा या परिसरातील प्लास्टिक बॉटल्स तसेच अन्य कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे किल्ल्यावर प्लास्टिक बॉटल्स, कागद इस्ततः पडलेले होते. हा किल्ला स्वच्च राहावा यासाठी ''गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांनी स्वच्छतामोहीम हाती घेतली होती. गड उतरतानाच्या पायवाटेवरील कचरा व प्लास्टिक बॉटल्स असे जवळपास २५ गार्बेज बॅग भरून कचरा त्यांनी संकलित केला. तो गडाखाली आणण्यात आला. संस्थेच्यावतीने गेले ५ वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचे आयोजन कोकण विभागाचे अध्यक्ष शुभम राणम, उपाध्यक्ष शुभम फाटक यांनी केले. या मोहिमेत युवती प्रमुख सुप्रिता नारकर, सायली पांचाळ, सतीश रानम, संदेश रानम, जीवन बराटे, नंदू गवस, सागर अनभवणे, विराज मांडवकर, संकेत मिशाळ, सानिका रानम, रूतिका रानम, नागेश कांबळे, प्रतीक जीवले यांच्याबरोबर संस्थेचे २२ दुर्ग सैनिक सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.