रत्नागिरीत शिवराज्याभिषेक सोहळा

रत्नागिरीत शिवराज्याभिषेक सोहळा

Published on

rat9p7.jpg-
25N69287
रत्नागिरी : नाचणे येथील राणी लक्ष्मीबाई महिला आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. मिरवणुकीत सहभागी पाहुणे, विद्यार्थिनी पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात छत्रपतींच्या वेशभूषेत सहभागी विद्यार्थिनी.
----
‘आयटीआय’त शिवराज्याभिषेक सोहळा
शहरात मिरवणूक; विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : नाचणे येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (महिला) शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये ढोलताशे लेझिमसह राज्याभिषेकाचे नाट्य सादर करून मिरवणूक काढण्यात आली. संस्कृती श्रीनिवास सकपाळ हिने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. या कार्यक्रमात कौशल्य उद्योजकता व नावीन्यता विभाग सचिव मनीषा वर्मा यांनी देखील शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून व्हिडिओ क्लिपद्वारे मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिवराज्याभिषेकाचे कार्यक्रम पार पडले. राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, उद्योजिका उमा देवळे, नाचणेच्या उपसरपंच निलेखा नाईक आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी ए. एस. देसाई आणि आयएमसी कमिटी सदस्य कौस्तुभ सावंत, सोनाली चव्हाण, उद्योजिका आणि पांडुरंग नंदीवाले उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य आर. डी. जानवेकर यांनी केले. सूत्रसंचालन तेजस पाटील व साक्षी कराडकर यांनी केले. आभार श्रुती वेतोस्कर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य आर. डी. जानवेकर व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

कुटुंब टिकणे आवश्यक
प्रमुख वक्त्या उद्योजिका उमा देवळे यांनी कुटुंब प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन केले. आज समाजामध्ये क्षुल्लक कारणांसाठी घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. एकत्र कुटुंबपद्धती आवश्यक असून त्याकरिता सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. एकत्रित भोजन करणे, सामूहिक उपासना, मुली, महिलांचा आदर राखणे अशा गोष्टी केल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com