पोर्णिमेनिमित्त आज मेर्वीत कार्यक्रम
पौर्णिमेनिमित्त आज
मेर्वीत कार्यक्रम
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. १०) सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा व अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती तसेच दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मठाचे अध्यक्ष सहदेव पावसकर यांनी केले आहे.
सीएसएमटी-मडगाव
एकेरीचे आरक्षण खुले
खेड : कोकण मार्गावर १४ जूनला धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-मडगाव एकेरी स्पेशलचे आरक्षण शनिवारपासून खुले झाल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. कोकणासह गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सीएसएमटी-मडगाव एकेरी स्पेशल चालवण्यात येणार आहे. सकाळी ७.३५ वाजता मुंबईतील सीएसएमटी स्थानकातून सुटणारी स्पेशल त्याच दिवशी रात्री १०.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या स्पेशलला १६ एलएचबी डबे जोडण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
भरणे मार्गावर
खड्डेच खड्डे
खेड : खेड-भरणे मार्गावर खड्डे पडले असून, वाहनचालकांची कसरत सुरू आहे. खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची फसगतही होत आहे. तालुका भाजपच्यावतीने मार्गावरील खड्डे बुजवून सुस्थितीत आणण्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन दिले. या वेळी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, उपाध्यक्ष उदय बोरकर, जिल्हा सरचिटणीस भूषण काणे, तालुका सरचिटणीस अजय तोडकरी उपस्थित होते.
-rat९p८.jpg ः
२५N६९२७९
दामिनी देवळेकर
दामिनी देवळेकर
एलएलएममध्ये प्रथम
चिपळूण : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉ (कायदा विभाग) द्वारे घेण्यात आलेल्या एलएलएम पदव्युत्तर परीक्षेचा निकाल जाहीर झाला. चिपळूणची दामिनी देवळेकर हिने विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावून चिपळूणचे नाव उज्ज्वल केले. तिचे शालेय शिक्षण चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण डीबीजे कॉलेज येथे घेतल्यानंतर तिने वकिलीची पदवी पुण्यातील एससीएलसी कॉलेजमधून पूर्ण केली. त्यानंतर पुणे विद्यापिठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉमधून बिझनेस लॉ या विशेष विषयात एलएलएम शिक्षण घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.