कोकणातील विद्वानांचा इतिहास सर्वदूर पोचणे गरजेचे
-rat९p१.jpg-
२५N६९२८१
चिपळूण ः आमदार नीलेश राणे यांचे लोकमान्य टिळक वाचनालयात स्वागत करताना यतीन जाधव.
--
विद्वानांचा इतिहास सर्वत्र पोहोचवा
नीलेश राणे : ‘लोटिस्मा’तील कलादालनाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : देशाला राष्ट्रपती नावापासून पिनकोड सुचवणारे कोकणातील दिग्गज विद्वान आहेत हे आपल्याला पहिल्यांदाच वाचनालयाच्या कलादालनातून समजले. कोकणातील विद्वानांचा हा इतिहास आज सगळ्यांना समजणे गरजेचे आहे. यासाठी वाचनालयाने राबवलेला उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असून, वाचनालयाला सर्वतोपरी मदत व सहकार्य करून वाचनालयाचाच एक भाग मी होणार आहे, अशा भावना आमदार नीलेश राणे यांनी वाचनालयाच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात व्यक्त केल्या.
आमदार नीलेश राणे आज रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी शिंदे शिवसेना गटाचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर पाग बौद्धवाडी परिसरातील समस्यांची माहिती घेतली तसेच राधाकृष्ण नगरमधील मुत्तपन मंदिरात दर्शन करून मंदिराच्यावतीने सत्कार स्वीकारला. चिपळुणातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर (लोटिस्मा) वाचनालयाच्या वस्तू संग्रहालय व कलादालनाची पाहणी केली. या वेळी वाचनालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
वाचनालयाचे आधारस्तंभ प्रकाश देशपांडे यांनी पौराणिक वस्तुसंग्रहालयासहित कलादालनाची माहिती देऊन वाचनालय भविष्यात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे; मात्र, आवश्यक जागा व आर्थिक सहकार्य मिळावे याकरिता प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आपण मदत कराल, अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना राणे म्हणाले की, वाचनालयाने उभारलेले पुरातन वस्तुसंग्रहालय अप्रतिम आहेच, त्याचबरोबर कलादालनात लावण्यात आलेली तैलचित्रे पाहून कोकणच्या भूमीत देशाला राष्ट्रपती नावासहित पिनकोड नंबर सुचवणारे दिग्गज विद्वान जन्माला आले आहेत, ही माहिती ऐकून आपण थक्क झालो आहोत. याबाबत आपणदेखील अनभिज्ञ होतो. असेच ज्ञान व माहिती इतरांना व्हावी यासाठी वाचनालयाच्या उपक्रमाला आपण सर्व सहकार्य करू. खासदार नारायण राणे यांनादेखील या उपक्रमाला सहकार्य करण्याबाबत आपण आग्रह करणार आहे. त्यांनीदेखील येथील पुरातन वस्तुसंग्रहालय व कलादालन पाहण्यास आवर्जून भेट द्यावी, असा त्यांच्याकडे हट्टच धरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.