दरड, पूरप्रवण क्षेत्रात सतर्क राहा

दरड, पूरप्रवण क्षेत्रात सतर्क राहा

Published on

69343

दरड, पूरप्रवण क्षेत्रात सतर्क राहा

दीक्षांत देशपांडे ः कणकवलीत ग्रामसेवक, सरपंच, तलाठ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ९ ः तालुक्‍यातील पाच गावांमध्ये दरड आणि पूर प्रवण क्षेत्रे निश्‍चित केली आहेत. अतिवृष्‍टीत या गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी सतर्क राहावे. आवश्‍यकता भासल्‍यास इथल्‍या नागरिकांच्या स्थलांतराची व्यवस्था निर्माण करा, अशा सूचना तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आज दिल्‍या.
तालुक्यातील पूरप्रवण क्षेत्रांमध्ये खारेपाटण शहर, कलमठ शहरातील काही वाड्या, वरवडे गावातील फणसनगर मधील काही भाग तसेच कळसुली आणि कसवण तळवडे या गावांमधील काही भाग हा निश्चित केला आहे. तर दरड प्रवण क्षेत्रांमध्ये दिगवळे, नडगिवे आणि नाटळ ही गावे निश्चित केली आहेत. या गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांची बैठक येथील तहसील कार्यालयात झाली.
श्री. देशपांडे म्‍हणाले, ‘मे महिन्यात झालेल्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी डोंगर खचण्याचे प्रकार झाले होते. सध्या पावसाचा जोर कमी असला तरी जूनच्या मध्यानंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच जुलै, ऑगस्ट महिन्यातही अतिवृष्‍टीची शक्‍यता आहे. त्‍यामुळे दरड आणि पूर प्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी सतर्क राहावे. अतिवृष्‍टी कालावधी इथल्‍या नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्याबरोबरच पूरस्थिती कालावधीत नातेवाइकांकडे जाण्याबाबत सूचना कराव्यात. तसेच गावातील शाळा, सार्वजनिक सभागृह या ठिकाणी देखील दरड आणि पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी आवश्‍यक उपाययोजना करावी.
---------
...तर नागरिकांचे स्थलांतर करा!
दरवर्षी अतिवृष्‍टी कालावधीत खारेपाटण शहरामध्ये पुराचे पाणी येते. तसेच कलमठ, वरवडे, कळसुली या गावातील वाड्यांमधील काही घरांमध्ये पाणी जाण्याचा धोका निर्माण होतो. अशी परिस्थिती निर्माण होण्याआधीच तेथील नागरिकांचे स्थलांतर करावे. तसेच मदतीची आवश्यकता असल्यास प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांनी या लोकांशी संवाद साधून त्यांना संभाव्य धोक्याची कल्पना द्यावी. कुणालाही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना श्री देशपांडे यांनी यावेळी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com