कावळेसाद पॉईंट बनणार ''फ्लॉवर व्हॅली पॉईंट''
69623
कावळेसाद पॉईंट बनणार ‘फ्लॉवर व्हॅली पॉईंट’
रंगीबेरंगी रोपांची लागवड; संदीप गावडेंसह भाजपचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या कावळेसाद पॉईंटला आता ‘फ्लॉवर व्हॅली पॉईंट’ म्हणून विकसित केले जात आहे. या अनोख्या उपक्रमामुळे दोन वर्षांत हा पॉईंट रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला दिसेल, ज्यामुळे पर्यटनाला एक नवीन आयाम मिळणार आहे. भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ संकल्प सोडल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत १०० हून अधिक विविध प्रकारची रोपे या भागात लावण्यात आली.
जिल्हाध्यक्ष सावंत यांनी श्री. गावडे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘संदीप गावडे प्रत्येक कार्यक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवतात. केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे, तर खऱ्या तत्परतेने कार्यक्रम राबवून तो पूर्णत्वास घेऊन जाणे ही त्यांची खासियत आहे. आजचा कार्यक्रम हे देखील त्याचेच एक उदाहरण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बुथने याचे उदाहरण घेऊन कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या पर्यटन नकाशावर कावळेसाद पॉईंटला एक नवीन आणि आकर्षक स्थान प्राप्त होईल.’’ यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, वनस्पती तज्ञ निखिल कुलकर्णी, बाबा काणेकर, मनोज नाईक, रवी मडगावकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, केसरी उपसरपंच संदीप पाटील, प्रदीप दळवी, दया परब, अनिकेत आसोलकर आदींचा समावेश होता. आंबोली, चौकुळ आणि गेळे भागातील ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उपस्थिती दर्शवली.
---------
झाडांचे संगोपन, देखभालही!
श्री. गावडे म्हणाले, ‘‘या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने नेहमी गजबजलेल्या कावळेसादला एक वेगळी ओळख निर्माण होईल, यासाठी आम्ही ‘फ्लॉवर व्हॅली पॉईंट’ हा उपक्रम राबवला आहे. येथे लावलेल्या झाडांच्या संगोपनाची आणि देखभालीची जबाबदारी देखील आम्ही घेणार आहोत. भाजप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक झाड मातृभूमीसाठी’ या उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला आहे. दोन वर्षांत कावळेसाद पॉईंट रंगीबेरंगी झाडा फुलांनी भरलेला दिसेल, ज्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. भविष्यातही परिसरात अशाच प्रकारचे उपक्रम राबवून या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्याचा आणि त्यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न असेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.