मातोंड मंदिर परिसरात काँग्रेसकडून वृक्षारोपण

मातोंड मंदिर परिसरात काँग्रेसकडून वृक्षारोपण

Published on

swt101.jpg
69596
मातोंडः काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित बाप्पा नाटेकर व अन्य.

मातोंड मंदिर परिसरात
काँग्रेसकडून वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्या पुढाकारातून मातोंड येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे राज्यभर वृक्ष लागवड सप्ताह मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचेच औचित्य साधत नाटेकर यांच्या उपस्थितीत सातेरी मंदिर परिसरात मंदिरचे मानकरी दादा म्हालटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वेंगुर्ले तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रशांत परब, स्थानिक प्रमुख कार्यकर्ते जयवंत परब, हनुमंत घाडी, बाप्पा वराडकर, विजय सावंत आदी उपस्थित होते. यावेळी नाटेकर यांनी पर्यावरणीय बदल आणि त्याचे सर्व जीवसृष्टीवर होणारे दुष्परिणाम सांगत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून मानवी जीवन कसे सुरक्षित करता येईल, याचे दाखले देत वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले.
..................
swt102.jpg
69597
सांगलीः सोहम देशमुख याला गौरविताना मान्यवर.

फिडे रॅपिड रेटींग बुद्धिबळ
स्पर्धेत सोहम देशमुखचे यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली आयोजित (कै.) बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी सोहम देशमुख याने तेरा वर्षांखालील वायोगटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा रविवारी (ता. ८) बापट बाल मंदिर, सांगली येथे पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण भारतामधून २२६ स्पर्धक सहभागी झाले. वरील स्पर्धेमध्ये एकूण ९ सामने झाले. त्यामध्ये प्रशालेतील विद्यार्थी देशमुख याने ५.५ एवढे गुण प्राप्त केले. या स्पर्धेत सोहम याने फिडे आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये तब्बल ७३ गुण प्राप्त केले. त्याला चषक व रोख १००० रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी त्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com