लांजा नगरपंचायतीचा कारभार मुख्याधिकारीविना
rat10p20.jpg
69618
लांजा नगरपंचायत
----------
लांजा नगरपंचायतीचा
कारभार मुख्याधिकाऱ्यांविना
नागरिकांची गैरसोय ; हर्षला राणेंची बदली
लांजा, ता. १०ः लांजा नगरपंचायतीवरील नगराध्यक्ष व नगरसेवक या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर आणि मुख्याधिकारी हर्षला राणे यांची अन्यत्र बदली झाल्याने संपूर्ण नगरपंचायतीचा कारभार हा रामभरोसे झाला आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण होत नाही, कैफियत मांडण्यासाठी अधिकारी उपलब्ध नाही, अशी अवस्था असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लांजा नगरपंचायतीला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे .
लोकप्रतिनिधी नसल्याने आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडायचे कोणाकडे, असा प्रश्न त्या त्या प्रभागातील नागरिकांसमोर आहे. तर मुख्याधिकाऱ्यांसह अन्य जबाबदार अधिकाऱ्यांचे पदही रिक्त असल्याने नागरिकांनी प्रश्न मांडायचे कोणाकडे आणि ते सोडवणार कोण? असाही प्रश्न आहे. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील काही भागांमध्ये नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. देवराईसह शहरातील अन्य काही भागांमध्ये काही महिन्यांपासून स्ट्रीटलाईट या पूर्णपणे बंद आहेत. यांसह नागरिकांच्या अन्य समस्यादेखील आहेत; मात्र या समस्या नेमक्या मांडायच्या कोणाकडे आणि त्यांची सोडवणूक कशाप्रकारे करायची, असा प्रश्न आता नागरिकांना भेडसावत आहे. कारण, नगरपंचायतीवरील नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याच्या गोष्टीला आज जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे; मात्र तरी देखील नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या नाहीत तर यापूर्वी असलेल्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांची अन्यत्र बदली झाल्याने सध्या नगरपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. देवरूख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी असलेले चेतन विसपुते यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आला आहे; मात्र ते देखील आठवड्यातून मंगळवार या दिवशी उपस्थित असतात. अन्यवेळेला या नगरपंचायतीमध्ये लोकांच्या प्रश्न, समस्या समजून घेणारा, त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणारा कोणीही संबंधित जबाबदार अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांचे प्रश्न हे खितपत पडून आहेत.
कोट
लांजा नगरपंचायतीचा कारभार हा कर्मचाऱ्यांच्या हातात देऊन अधिकारी मोकळे झाले आहेत. त्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लांजाला कोणी वालीच नसल्याचे दिसून आले आहे. येत्या निवडणुकीत येथील जनता राज्यकर्त्यांना जागा दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही
- सचिन लिंगायत, शिवसेना ठाकरे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.