ःसंकल्पपूर्तीची परंपरा महाराष्ट्रात रुजली पाहिजे

ःसंकल्पपूर्तीची परंपरा महाराष्ट्रात रुजली पाहिजे

Published on

- ratchl१०१.jpg-
२५N६९६८३
चिपळूण ः एस. बी. पाटील यांचा सत्कार करताना अध्यक्ष सुभाषराव चव्हाण. शेजारी मान्यवर.
-----------
संकल्पपूर्तीची परंपरा राज्यात रूजावी
एस. बी. पाटील : चिपळूण पतसंस्थेचा संकल्प मेळावा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने पारदर्शकपणे आर्थिक कारभार सांभाळत सभासदांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी संकल्प मांडला जातो आणि तो संकल्प १०० टक्के पूर्णदेखील केला जातो. संकल्प व संकल्पपूर्तीचा सोहळा करणारी एकमेव चिपळूण नागरी पतसंस्था आहे. हीच परंपरा महाराष्ट्रामध्ये जर रूजली तर सर्व प्रकारच्या संस्था चांगल्या पद्धतीने काम करतील, असे उद्गार सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहसचिव एस. बी. पाटील यांनी काढले.
शहरातील बहादूरशेखनाका येथील चिपळूण नागरीच्या ''सहकार भवन'' सभागृहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा संकल्प मेळावा व सहकार कार्यशाळा सोमवारी झाली. या वेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक साबळे, संचालक सूर्यकांत खेतले, अशोक कदम, मनोहर मोहिते, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी आदी उपस्थित होते.
चव्हाण यांनी संस्थेच्या ३२ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. सहकार कार्यशाळेपूर्वी ६ व ७ जून या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे नऊ कोटी रुपयांच्या ठेवी संकलित झाल्याचे सांगितले. सहकारातून समृद्धी, सहकारात व्यवस्थितपणे अर्थपुरवठा केला तर समृद्धी फार दूर नाही. ती समृद्धी साधण्यासाठी सहकाराशिवाय पर्याय नाही. सहकार हा एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे साधन आहे आणि ते अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अशा पद्धतीने कार्यशाळा घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

काजू बी, आंबा खरेदीसाठी प्रयत्न
संस्थेने शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी चालना दिलेली असताना आता संस्थेच्या स्वयंरोजगार संस्थेच्या माध्यमातून काजू बी आणि आंबा खरेदी करण्याचा निर्णय आम्ही पुढील काळात घेतला आहे. यातून आंबा-काजू बागायतदारांसाठी मार्केटची व्यवस्था होईल, असे सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com