जिल्हा पोलिस दलात ११२ नवीन पोलिस शिपाई हजर

जिल्हा पोलिस दलात ११२ नवीन पोलिस शिपाई हजर
Published on

- rat११p११.jpg-
P२५N६९८२०
रत्नागिरी ः जिल्हा पोलिसदलामध्ये ११२ नवप्रविष्ट पोलिस शिपाई मुख्यालयात हजर झाले. त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व उपअधीक्षक राधिका फडके आदी.
---
जिल्हात ११२ नवीन पोलिस शिपाई
नितीन बगाटे ः कोमल सावते ‘सर्वोत्तम कमांडो’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ः ‘नवप्रविष्ट पोलिस शिपाई यांनी कर्तव्याप्रती समर्पण आणि शिस्त राखणे, सोशल मीडियावर योग्य वर्तन राखणे, योग्य व स्मार्ट पोलिसिंग करणे आणि सर्व प्रकारची कर्तव्ये पार पाडण्याबाबत व अपग्रेड होणे गरजेचे आहे. वेळोवेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश प्राप्त करावे’, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले. तसेच नवप्रविष्ट महिला पोलिस शिपाई कोमल सावते यांनी सांगली तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ‘सर्वोत्तम कमांडो’ प्रशिक्षणार्थी आणि अंजली यादव यांनी सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी म्हणून चषक मिळवल्याबद्दल बगाटे यांनी विशेष अभिनंदन केले.
मूलभूत पोलिस प्रशिक्षण पूर्ण करून जिल्हा पोलिसदलामध्ये नवप्रविष्ट झालेल्या पोलिस शिपाई मार्गदर्शन करत होते. ११२ पोलिस शिपाई मंगळवारी (ता. १०) पोलिस मुख्यालयात हजर झाले. नवप्रविष्ट शिपायांचे प्रशिक्षण १० ऑक्टोबर २०२४ ला बाभळगाव (लातूर) येथे झाले. त्या वेळी त्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात ६६ पुरुष नवप्रविष्ट पोलिस शिपाई तसेच तुरची जिल्हा सांगली येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ४५ महिला नवप्रविष्ट पोलिस शिपाई तसेच ११ डिसेंबर २०२४ ला १ नवप्रविष्ट पोलिस शिपाई चालक पोलिस प्रशिक्षण केंद्र नाणविज (दौंड) येथे त्यांना रत्नागिरी जिल्हा पोलिसदलामार्फत मूलभूत पोलिस प्रशिक्षणाकरिता पाठवण्यात आले होते. या वेळी अप्पर पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, राखीव पोलिस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे, पोलिस अधिकारी, मंत्रालय कर्मचारी, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com