आयुर्वेद उपचार पध्दती उत्तम पर्याय
swt111.jpg
69848
नेरुरः आयुर्वेदिक उपचार महाशिबिरामध्ये बोलताना सहाय्यक धर्मादाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी. बाजूला उमेश गाळवणकर, डॉ. मुरलीधर प्रभूदेसाई, डॉ. माधुरी प्रभूदेसाई, डॉ. प्रशांत सासणे, न्या. गजानन कुलकर्णी, प्रा. कल्पना भंडारी आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
आयुर्वेद उपचार पध्दती उत्तम पर्याय
अवंतिका कुलकर्णीः नेरुरमध्ये महाशिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती एक उत्तम पर्याय आहे. त्या उपचारांचे विपरित परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. आपले ध्येय, स्वप्न प्राप्त करायची असतील तर निरोगी आयुष्य हे सर्वात महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहाय्यक धर्मादाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी यांनी केले. या मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण ४१० रुग्णांनी विविध उपचारांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
नेरुर येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, आयुष मंत्रालय भारत सरकार आणि (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक उपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. मुरलीधर प्रभूदेसाई, डॉ. माधुरी प्रभूदेसाई, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. प्रवीण भट, डॉ. दत्तप्रसाद पवार, डॉ. अंकिता मसूरकर, डॉ. स्वाती पटेल, डॉ. नीतेश हुकरे, गजानन कुलकर्णी, गणपत वेंगुर्लेकर, अमृता गाळवणकर, रणजित देसाई, प्रा. कल्पना भंडारी, प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन आदी उपस्थित होते.
डॉ. प्रभूदेसाई यांनी, श्री. गाळवणकर यांनी विविध शिक्षणक्रमांच्या सहकार्याने आयोजित केलेले आयुर्वेदिक उपचार महाशिबिर हा उपक्रम स्तुत्य आहे, असे सांगितले. सर्वांना आपल्या अधिकाराची माहिती असणे गरजेचे आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गतर्फे उभारलेल्या कक्षातून ही कायदेशीर माहिती देण्यात येईल; त्याचा लोकांनी उपयोग करावा, असे आवाहन न्यायाधीश कुलकर्णी यांनी यांनी केले. रणजित देसाई यांनी गाळवणकर व त्यांचे सहकारी राबवित असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सायली गावडे व त्यांचे सहकारी, बीएमएस स्टुडंट आदित्य राज, अर्चित सोनी, गणपतसिंग राजपुरोहित, सुप्रिया मिश्रा, तवीशी शर्मा, संस्थेच्या पल्लवी कामत, प्रा. वैशाली ओटवणेकर, डॉ. प्रा. पलटासिंग, प्रा. सुमन करांगळे सावंत, प्रा. शांभवी आजगावकर, प्रा. प्रथमेश हरमलकर, प्रा. शंकर माधव, प्रसाद कानडे, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांच्या वतीने मनोज वालावलकर, स्वानंद सामंत, अभय वालावलकर, रोहन देसाई, गणपत वेंगुर्लेकर, प्रा. अरुण मर्गज आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रणाली मयेकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.