पाट हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षपदी डी. ए. सामंत

पाट हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षपदी डी. ए. सामंत
Published on

swt112.jpg
69849
पाटः कार्याध्यक्ष साळगावकर यांचे अभिनंदन करताना अध्यक्ष डी. ए. सामंत व नूतन पदाधिकारी.

पाट हायस्कूल संस्थेच्या
अध्यक्षपदी डी. ए. सामंत
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ११ः एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट हायस्कूल संस्थेच्या २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारी संचालक मंडळाची निवड प्रक्रिया मंगळवारी (ता. १०) बिनविरोध पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी डी. ए. सामंत, उपाध्यक्ष गुरुनाथ पाटकर, कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, कार्यवाह विजय ठाकूर व खजिनदारपदी दीपक पाटकर यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या संचालकपदी अवधूत रेगे, नारायण तळवडेकर, राजेश सामंत, महेश ठाकूर, सुधीर मळेकर, महाबळेश्वर कोचरेकर व हिशेब तपासणीसपदी शरद कोनकर यांची निवड करण्यात आली. साळगावकर यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सामंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. साळगावकर हे गेली १८ वर्षे संस्थेत कार्यरत आहेत. यापूर्वी ते संस्थेच्या सचिवपदी कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com