दळवींच्या ''अलाणे-फलाणे'' सदरावर रसग्रहण

दळवींच्या ''अलाणे-फलाणे'' सदरावर रसग्रहण
Published on

swt114.jpg
69851
शिरोडाः (कै.) जयवंत दळवी खुल्या साहित्य चर्चेत सहभागी रसिक वाचक.

दळवींच्या ‘अलाणे-फलाणे’ सदरावर रसग्रहण
शिरोडा वाचनालयातील कार्यक्रमः साहित्य प्रेरणा कट्ट्याचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः साहित्यिक (कै.) जयवंत दळवी जन्मशताब्दी प्रीत्यर्थ आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्यावतीने चालू असलेल्या खुल्या साहित्य चर्चेत जयवंत दळवी यांच्या ‘अलाणे-फलाणे’ या ललित मासिकातील सदरावरील पुस्तकांवर चर्चा करण्यात करण्यात आली.
साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत साहित्यिक विनय सौदागर यांनी पत्ररुपातील या सदराच्या स्वरुपाविषयी थोडक्यात माहिती सांगून सदराविषयी विवेचन केले. साहित्यिक क्षेत्रातील तत्कालीन घडामोडींचा नर्मविनोदी पद्धतीने पत्ररुपात दळवी यांनी घेतलेला वेध असे ‘अलाणे-फलाणे’ सदराचे वर्णन त्यांनी यावेळी बोलताना केले.
सभोवताली घडणाऱ्या साहित्यिक घडामोडींची माहिती असल्याशिवाय ‘अलाणे-फलाणे’ यांचा हा पत्रव्यवहार समजणे कठीण होते, असेही ते म्हणाले. दळवी यांनी या सदरामधून स्वतःवरही टीका केली असल्याचे सांगून या पुस्तकातील निवडक उतारे त्यांनी यावेळी वाचून त्यावर विवेचन केले.
त्यानंतर झालेल्या चर्चेत खटखटे ग्रंथालयाचे सदस्य सचिन दळवी, प्रा. गजानन मांद्रेकर, कवयित्री प्रा. नीलम कांबळे, लेखिका स्नेहा नारिंगणेकर, चोखंदळ वाचक सरोज रेडकर, जयदीप देशपांडे तसेच ग्रंथप्रेमी एकनाथ शेटकर, अविनाश जोशी, शरद परुळेकर, सुनंदा परुळेकर, विनया परुळेकर यांनी भाग घेतला.
खुल्या साहित्य चर्चेतील अठ्ठाविसाव्या पुस्तकावरील या चर्चेच्या प्रारंभी विनय सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अर्चना लोखंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com