शास्त्री नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिल

शास्त्री नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिल
Published on

- rat११p२१.jpg-
P२५N६९८६५
संगमेश्वर ः शास्त्री नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनातर्फे मॉकड्रिल करताना सदस्य.
----
शास्त्री नदीपात्रात मॉकड्रिल
आपत्ती व्यवस्थापन विभाग; पूरस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांचा बचाव कसा करावा यासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्याच्यावतीने सोमवारी (ता. ९) सायंकाळी शास्त्री नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचे (मॉकड्रिल) आयोजित करण्यात आले होते. शहरातील गद्रे वखार विसर्जन घाटावर झालेल्या या मॉकड्रिलमध्ये पूरस्थिती हाताळण्यांबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आहेत.
अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून बचावकार्य कसे राबवावे याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. या वेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांना बोटींगचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच घरातल्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून पुराच्या पाण्यात स्वतःचा जीव कसा वाचवता येतो, याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
संगमेश्वर परिसरात अतिवृष्टीत पूरपरिस्थिती निर्माण होते, हे लक्षात घेऊन सोमवारी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत मॉकड्रिल घेण्यात आले. या सरावासाठी संगमेश्वर पोलिसदलाचे २ अधिकारी, १० अंमलदार, ६ होमगार्ड, नावडी गावातील ८ तरबेज पोहणारे सदस्य आणि नावडी ग्रामपंचायतीचे ५ कर्मचारी सहभागी झाले होते. या एकत्रित सरावामुळे आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com