टेटवलीत

टेटवलीत

Published on

-rat१०p९.jpg -
KOP२५N६९५९१
दापोली ः टेटवली मोहल्ला मुख्य रस्त्याच्या पुलाखाली आलेल्या मगरीला अधिवासात सोडण्यात आले.
---
टेटवलीत आलेल्या मगरीचे ‘रेस्क्यू’
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ११ ः तालुक्यातील टेटवली मोहल्ला मुख्य रस्त्याच्या पुलाखाली आलेली मगर वनविभागाचे रेस्क्यू पथकाने सुरक्षित ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली.
दापोली तालुक्यातील टेटवली येथील मोहल्ला लोकवस्तीनजीक ब्रिजखाली पाण्याच्या डोहाजवळील मगर येऊन बसल्याची माहिती सरपंच मोबील टेटवलकर यांनी वनविभागाला दिली. या ठिकाणी लहान शाळकरी मुलांचा व नागरिकांचा वावर असल्याने तिला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे आवश्यक होते. कामगिरी वनपाल दापोली रामदास खोत, वनरक्षक विश्वंभर झाडे, शुभांगी गुरव, सुरज जगताप, प्रभू साबणे तसेच वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर पथकाचे तुषार महाडिक, मिलिंद गोरिवले आणि त्यांचे पथक उपस्थित होते. दापोली तालुक्यात वन्यजीव लोकवस्तीत आल्यास, जखमी अवस्थेत निदर्शनास आल्यास तत्काळ दापोली वनविभागाशी हॅलो फॉरेस्ट १९२६, वनक्षेत्रपाल दापोली पी. जी. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com