महामार्गावरील खड्डे त्या दोघांनी भरले

महामार्गावरील खड्डे त्या दोघांनी भरले

Published on

महामार्गावरील खड्डे
‘त्या’ दोघांनी भरले
संगमेश्वर ः संगमेश्वर बसस्थानक ते सोनवी पुलाजवळील नाक्यात अनेक भलेमोठे खड्डे पडलेले असून, त्या ठिकाणी आतापर्यंत लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्या ठिकाणी पुलाचे कामही सुरू असून, ठेकेदाराला अनेकवेळा खड्डे भरण्यासाठी वाहनचालक आणि व्यापाऱ्यांनी कळवले होते; मात्र ठेकेदाराने लक्ष दिले नाही. अखेर या नाक्यातील खड्डे भरण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्ते सयाजी हळदकर आणि शाम घडशी यांनी स्वत: ते खड्डे भरले. एकप्रकारे महामार्गाच्या अधिकाऱ्यांना ही चांगलीच चपराक असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

‘आरोग्य विज्ञान’चा
वर्धापनदिन साजरा
संगमेश्वर : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचा वर्धापनदिन १० जूनला संगमेश्वर येथील नवनिर्माण नर्सिंग कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापिठाच्या ध्वजवंदनाने झाली. या वेळी विद्यापीठ गीत लावून ध्वजाला सलामी देण्यात आली. ध्वजवंदनाचा सन्मान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी डॉ. संजना आंब्रे, प्रा. स्नेहल खेराडे, अमृता पाल्ये, प्रेरणा महाडिक, नेहा सरवणकर, साक्षी जाधव, रोशनी तोडकरी, अंजली कंगणे, दीपक भोसले, योगेश सरकटे, ओंकार जाधव यांसह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रा. स्नेहल खेराडे यांनी विद्यार्थ्यांना विद्यापिठाच्या इतिहासाची माहिती देत वर्धापनदिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

मत्स्य महाविद्यालयात
पदविका प्रवेश
रत्नागिरी ः दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठांतर्गत येथील शिरगाव मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशअर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ जूनपर्यंत आहे. त्यामध्ये तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. सहा सत्रात चालणाऱ्या या अभ्यासक्रमात प्रतिवर्षी ३० विद्यार्थी गुणवत्तेनुसार निवडले जातात. पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अतिरिक्त गुणांसाठी शेतजमीन असल्यास सातबाराचा उतारा, मासेमारी असल्यास मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे प्रमाणपत्र उमेदवारांना अर्जासोबत जोडावे लागणार आहे. इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमात मासेमारी नौका बांधणी, मरिन इंजिन दुरुस्ती, मासेमारी तंत्रज्ञान, मत्स्यसंवर्धन अभियांत्रिकी, मत्स्यप्रक्रिया, शितकीकरण तंत्रज्ञान या विषयी सखोल प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी महाविद्यालयाला किंवा https://www.dbskkv.org/Admission.html या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com