

swt1111.jpg
69959
कोलंबो : येथे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके जिंकून यश मिळविणाऱ्या मालवणच्या स्नुषा क्षमा रेडकर, सोबत अन्य खेळाडू.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ खेळाडूंचा श्रीलंकेत डंका
मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत पदांची लूट; मालवणातील क्षमा रेडकरांची रौप्य कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या इंटरनॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना विविध खेळांत यश मिळवीत पदकांची लयलूट केली. यामध्ये महाराष्ट्र पोलिस दलातील सेवानिवृत्त पोलिस अंमलदार आणि मालवणच्या स्नुषा क्षमा मधुकर रेडकर यांनी ६० वर्षांवरील महिला गटात ३००० मीटर धावणे प्रकारात रौप्य पदक, तर १५०० मीटर धावणे प्रकारात कांस्य पदक पटकावत महाराष्ट्रासह मालवण आणि मुंबई मरोळ विभागाचे नाव रोशन केले.
या स्पर्धेत शशिकांत जितेकर यांनी ५० वर्षांवरील पुरुष गटात भालाफेकमध्ये सुवर्ण पदक, आनंद जितेकर यांनी ४५ वर्षांवरील पुरुष गटात भालाफेकमध्ये सुवर्णपदक, थाळीफेकमध्ये कांस्यपदक, दारा सिंग यांनी ५५ वर्षांवरील पुरुष गटात भालाफेकमध्ये सुवर्णपदक, वसुंधरा पिटलेवार यांनी ५० वर्षांवरील महिला गटात २००० मीटर स्ट्रिपल चेसमध्ये सुवर्ण पदक, ८० मीटर हर्डल व ३०० मीटरमध्ये रौप्य पदक, रेणू सिंधू यांनी ४५ वर्षांवरील महिला गटात ८०० मीटर, १५०० मीटर व ५००० मीटर धावणेमध्ये रौप्य पदक, भगवान बोथे यांनी हातोडाफेकमध्ये रौप्य पदक, ६५ वर्षांवरील पुरुष गटात उत्तम माने यांनी लांब उडीमध्ये कांस्य पदक व अरविंद संगर यांनी हातोडाफेकमध्ये कांस्य पदक, संतोष पवार यांनी ५५ वर्षांवरील पुरुष गटात ४०० मीटर हर्डलमध्ये कांस्य पदक पटकाविले, तर अमित विचारे, रोहित सचिन जगताप, डॉ. पौर्णिमा मयेकर, शिवानंद शेट्टी यांनीही विविध खेळांत कांस्य पदक मिळवीत यश प्राप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.