

swt1119.jpg
69930
सिंधुदुर्गनगरी : येथे आयोजित सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसोबत माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत व इतर मान्यवर.
पत्रकार पाल्यांचे यश कौतुकास्पद
मुकुंद चिलवंत : सिंधुदुर्गनगरीत गुणवंतांचा सत्कार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ : पत्रकारांची मुले शिक्षणाच्या विविध वाटा चोखाळत यश मिळवित आहेत, ते पाहून समाधान वाटते. पत्रकारितेमधून समाजसेवा करताना आपल्या मुलांकडे, त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्यप्रकारे घडविले जात आहे, ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी आज सत्कार कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सभासद मुलांचा सत्कार सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवनाच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चिलवंत बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर होते. व्यासपीठावर गणेश जेठे, बाळ खडपकर, नंदकुमार आयरे उपस्थित होते.
या कार्यक्रमात २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांतील गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यात २०२४ मध्ये बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्या वालावलकर, दहावी परीक्षेत उत्तीर्ण सोनम काळसेकर, २०२५ मध्ये दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भूमिका हरमलकर, बारावी परीक्षेत उत्तीर्ण पूर्वा गावडे व ऋषिकेश आयरे तसेच बीएससी नर्सिंग पदवी प्राप्त केलेल्या अस्मिता म्हाडेश्वर आणि बीएससी स्टेटस्टिक पदवी प्राप्त केलेल्या प्रियंका जेठे या मुलांचा सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. गणेश जेठे, बाळ खडपकर यांनीही विचार व्यक्त केले.
श्री. म्हाडेश्वर म्हणाले, ‘‘आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी कौटुंबिक सोहळा आहे. गेल्यावर्षी काही कारणाने हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. आता काही दिवसांत शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुले उपलब्ध होणार नाहीत. परिणामी अगदी दोन दिवसांत हा कार्यक्रम आम्ही ठरविला. सर्वांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित राहिल्याने आनंद झाला. आमचे सभासद पाल्य पूर्वा गावडे हिची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली असून, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिचा आम्ही मोठा सत्कार सोहळा करणार आहोत.’’
सूत्रसंचालन विनोद दळवी यांनी केले. आभार दत्तप्रसाद वालावलकर यांनी मानले. यावेळी संदीप गावडे, संजय वालावलकर, तेजस्वी काळसेकर, मनोज वारंग, विनोद परब, सतीश हरमलकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.