दापोली- सोंडेघर- पालगडमार्गे वाहतूक
दापोली- पालगडमार्गे
अवजड वाहतूक
रत्नागिरी : खेड-दापोली राज्यमार्गाचे नव्याने काम चालू असल्यामुळे 22 जूनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक ही खेड दस्तूरीमार्गे पालगड-सोंडेघरमार्गे दापोलीकडे व दापोलीकडून खेडकडे जाणारी अवजड वाहने ही दापोली-सोंडेघर –पालगड दस्तुरीमार्गे खेडकडे वाहतूक वळवण्यात यावी, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. फुरूस येथील पुलाचे रिर्टन वॉलचे काम करण्यासाठी आणि पाण्याचा प्रवाह पूर्ण झालेल्या पुलामधून वळवण्यासाठी उद्यापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक खेड-दापोली मार्गावरील फुरूस येथील पुलाच्या ठिकाणी बंद करण्यात यावीत. वाहतूक कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी या दृष्टीने मोटार वाहतुकीची चिन्हे उभारावीत, असे आदेशात म्हटले आहे.
कीर, काद्रींचा सत्कार
रत्नागिरी ः काँग्रेसच्या नेत्या व माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते रत्नागिरी येथे भंडारी समाजाचे नेते राजीव कीर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणे रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अश्फाक काद्री यांची निवड झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. काँग्रेस प्रदेश व्हीजेएनटीचे पदाधिकारी व रत्नागिरीतील काँग्रेस कार्यकर्ते परशुराम खेत्री यांचाही सत्कार करण्यात आला.
हर्णै येथे रविवारी
मल्लखांब स्पर्धा
दापोली ः तालुका मल्लखांब असोसिएशन आणि सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ, हर्णै यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित आहे. या स्पर्धेत लाकडी मल्लखांब, रोप मल्लखांब, लाठीकाठी आणि बगडुल या खेळांचा समावेश आहे. मोठ्या संख्येने खेळाडू यात सहभागी होणार आहेत. जागतिक मल्लखांब दिनानिमित्त ही स्पर्धा १५ जूनला हर्णै येथील मळेकर सभागृहात सायंकाळी ४ ते ७ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून सरपंच ऐश्वर्या धाडवे, अविनाश निवाते, सुनील आंबुर्ले, दीपक खेडेकर, भालचंद्र मुसलोणकर उपस्थित राहतील.
दापोली येथील
रुग्णांची तपासणी
दापोली ः येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला कर्करोग तपासणी अभियानांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व जनजागृती करण्यात आली. यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष प्रयत्न केला. या तपासणीमध्ये तालुक्यातील ३१३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तोंडाचा कर्करोग १९०, गर्भाशयाचे तोंड ४६, स्तन कर्करोग ७७ पेशंटची तपासणी करण्यात आली. यामध्ये संशयित म्हणून तोंडाचे कर्करोग ८ रुग्ण, स्तनाचा कर्करोग १ महिला रुग्ण दिसून आले आहेत. त्यांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे. तसेच यामध्ये पुरुषवर्ग यांची सुद्धा इतर कर्करोग तपासणी करण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा कृपा घाग, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, नगरसेविका शिवानी खानविलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत, तालुका संघटक प्रदीप सुर्वे, नगरसेविका प्रिती शिर्के आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.