''शक्तीपीठ'' पर्यटन वृध्दीसाठी नव्हे; मायनिंगसह कोळसा वाहतूकीसाठी

''शक्तीपीठ'' पर्यटन वृध्दीसाठी नव्हे; मायनिंगसह कोळसा वाहतूकीसाठी
Published on

swt1112.jpg
N69941
डॉ. जयेंद्र परुळेकर

‘शक्तीपीठ’ पर्यटन वृध्दीसाठी नव्हे;
मायनिंगसह कोळसा वाहतूकीसाठी
डॉ. जयेंद्र परुळेकरः केसरकरांच्या ‘त्या’ विधानावरुन सिध्द
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा, अशी मागणी आमदार दिपक केसरकर मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. यातूनच हा महामार्ग पर्यटनाच्या वृध्दीसाठी नसून मायनिंग आणि कोळसा वाहतूकीसाठी असणार आहे हे सिद्ध होत आहे, असा दावा डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकातून केला.
डॉ. परुळेकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, शक्तीपीठ महामार्ग पर्यटनासाठी नव्हे तर विदर्भातून कोळसा आणण्यासाठी हा महामार्ग असणार अशीच चिन्हे आहेत. मळेवाड ते आजगाव धाकोरे या नऊ गावातील प्रस्तावित मायनिंग प्रकल्प आणि स्टील स्मेल्टिंग प्रकल्प तसेच नाणोस मधील प्रस्तावित मायनिंग प्रकल्प अशा अनेक विनाशकारी प्रकल्पांसाठी हा शक्तीपीठ महामार्ग नियोजित करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
गेळे ते केसरी फणसवडे असा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बोगदा करणार असल्याचे आमदार केसरकर सांगत आहेत, ही जनतेची दिशाभूल आहे. कारण तसा बोगदा करणार असल्यास गेळे, आंबोली, नेनेवाडी, उडेली, फुकेरी, घारपी, असनिये, झोळंबे, तांबोळी, डेगवे, बांदा इत्यादी बारा गावांमध्ये जमीन सर्वेक्षण प्रक्रिया का राबविण्यात आली? जिल्ह्यातील जवळपास ३६ किमी लांबीच्या आणि १०० मीटर रुंदीचा जमिनपट्टा अधिग्रहण करण्यासाठी प्रशासन का हालचाली करत आहे? याचाच अर्थ जनतेची दिशाभूल करून त्यांना गाफील ठेवून जमीन अधिग्रहण करण्याचा हा डाव आहे. या महामार्गासाठी लाखो वृक्षांची कत्तल होणार आहे हे निश्चित आहे; पण जनतेत त्या विरोधात रोष निर्माण होऊ नये म्हणून ही दिशाभूल सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com