संगमेश्वरमध्ये कामाच्या वादातून मजुराला मारहाण

संगमेश्वरमध्ये कामाच्या वादातून मजुराला मारहाण
Published on

संगमेश्वरमध्ये मजुराला मारहाण
तिघांविरुद्ध गुन्हा; कामाच्या वादातून प्रकार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः कामावर येणार नाही, असे सांगितल्याच्या रागातून एका मजुराला तिघांनी मिळून लाकडी रिपने मारहाण केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (ता. ९) सायंकाळी घडली. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विकास किसन चव्हाण (वय २६, मूळ रा. अलिबादी तांडा, जि. विजापूर, सध्या रा. लोवले, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. विकास यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नामदेव चव्हाण (वय ४६), विनोद नामदेव चव्हाण (वय २२) आणि अनिल चव्हाण (वय २७, सर्व रा. लोवले) या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास चव्हाण आणि संशयित हे सर्व मूळचे कर्नाटक येथील रहिवासी असून, सध्या ते लोवले येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी नामदेव चव्हाण याने विकास यांना ‘तू कामावर का जाणार नाहीस?’ अशी विचारणा केली. त्यावर विकास यांनी ‘माझ्या छातीत दुखत असल्याने मी कामावर येणार नाही,’ असे प्रतिउत्तर दिले. याचा राग आल्याने नामदेव चव्हाण याने विकास यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी, अनिल चव्हाण याने लाकडी रिप उचलून विकास यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मारून त्यांना जखमी केले.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विकास यांच्या पत्नीली नामदेव चव्हाण याने ढकलून दिले, ज्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. याबाबत विकास चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १० जून) संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलिस हवालदार व्ही. व्ही. मनवल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com