

लांजा शहरातून
दुचाकीची चोरी
लांजा, ता. ११ ः लांजा शहरातील आडपरिसरातून दिवसाढवळ्या मंडळ अधिकारींची दुचाकी चोरीला गेली. लांजा पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार कुलदीप नामदेव गायकवाड (वय ४०, रा. लांजा माऊलीनगर, मूळगाव नांदेड उज्ज्वल नगर, जिल्हा नांदेड) यांनी दाखल केली आहे. गायकवाड हे ६ जून रोजी सायंकाळी मोपेड घेऊन लांजा आडाजवळ असणाऱ्या कृषी विभागाच्या नर्सरीमध्ये झाडे आणण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी आपली दुचाकी त्या ठिकाणी असलेल्या एका झाडाजवळ उभी केली होती. त्यानंतर ते झाडे आणण्यासाठी नर्सरीमध्ये गेले होते. त्यानंतर झाडे घेऊन जेव्हा परत आले तेव्हा त्यांची दुचाकी लावलेल्या ठिकाणी नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.