क्राईम

क्राईम
Published on

डंपरची वासराला धडक
रत्नागिरी ः हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे डंपर चालवून चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या गायीच्या वासराला ठोकर दिली. या अपघातामध्ये वासरू जखमी झाले. याबाबत माहिती न देता डंपर चालकाने पलायन केले. या प्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास कारवांचीवाडीपासून शंभर मीटर अंतरावर हातखंबा ते रत्नागिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलिस हवालदार उदय बांदल यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देवरूख बाजारपेठेत
जुगारावर कारवाई
रत्नागिरी ः देवरूख (ता. संगमेश्वर) येथील एका इमारतीच्या बाजूच्या गल्लीत मटका जुगारावर देवरूख पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरूख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश नाना कदम (वय ४५, रा. देवरूख आंबेडकरनगर, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) सायंकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

वाहतुकीस अडथळा,
चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथील एका बॅंकेच्यासमोर वाहन पार्क करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत शंकर खानविलकर (वय ६५, रा. गोळवशी, धामनवाडी, ता. लांजा) असे मोटारचालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिस शिपाई किशोर पवार यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com