कठोर परिश्रमांतून उत्तुंग भरारी घ्या

कठोर परिश्रमांतून उत्तुंग भरारी घ्या

Published on

swt124.jpg
70114
चिंदरः सरस्वती वाचनालयामध्ये सत्कार सोहळ्याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवर.

कठोर परिश्रमांतून उत्तुंग भरारी घ्या
प्रकाश मेस्त्रीः चिंदरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १२ः दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करा. त्यासाठी कठोर मेहनत करा. आयपीएस सुब्रमण्य केळकर, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून अभिनंदन पात्र अभियंता (कै.) वसंत मेस्त्री यांनी मराठी माध्यम शाळेतच शिक्षण घेऊनच यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली. त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करा, असे प्रतिपादन श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरचे अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांनी गुणगौरव समारंभात बोलताना केले.
श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरच्या वतीने गावातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सरस्वती वाचनालयात पार पडला. यामध्ये दहावीतील कोमल अपराज (जनता विद्या मंदिर त्रिंबकमध्ये प्रथम), कुंदन नाटेकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा, मराठी माध्यम व्दितीय), दिनेश माळगावकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा इंग्रजी माध्यम, प्रथम), अनुष्का हडकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा, व्दितीय क्रमांक), बारावीतील मयुरेश साटम (वाणिज्य विभाग, कनिष्ठ महाविद्यालयात आचरामध्ये प्रथम), वैष्णवी परब (कनिष्ठ महाविद्यालय आचरा, कला विभाग प्रथम), गौरव लब्दे (कनिष्ठ महाविद्यालय आचरा, कला विभाग व्दितीय) यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. वाचनालय कार्यकारिणी सदस्य महेंद्र मांजरेकर, रावजी तावडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी चिंदर ग्रामपंचायतीमधून बदली झालेले प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश साळसकर यांचाही वाचनालयातर्फे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, संविधानाच्या पुस्तकाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. चिंदर ग्रामपंचायतीकडून सरस्वती वाचनालयाला वीस हजार रुपये किंमतीची पुस्तके देण्यात आली. ही पुस्तके सरपंच नम्रता महंकाळ-पालकर यांच्या हस्ते अध्यक्ष मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी प्रकाश खोत, विवेक परब, गोपाळ चिंदरकर, संतोष अपराज, भूषण दत्तदास, प्रफुल्ल माळगांवकर, अनिल लब्दे, रणजित दत्तदास, रोहित पाटील, तुषार पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रावजी तावडे यांनी, सूत्रसंचालन सिध्देश गोलतकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com