तोरसोळे रस्त्याचे काम असमाधानकारक

तोरसोळे रस्त्याचे काम असमाधानकारक

Published on

swt1210.jpg
70133
देवगड ः तालुक्यातील तोरसोळे रस्त्याची सुशांत नाईक यांनी पहाणी केली. यावेळी रवींद्र जोगल उपस्थित होते.

तोरसोळे रस्त्याचे काम असमाधानकारक
सुशांत नाईकः ग्रामस्थांच्या मागण्यांनुसार काम करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ः मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरु असलेल्या तालुक्यातील तोरसोळे गावच्या रस्ता कामाची ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पहाणी केली. रस्त्याचे काही भागातील झालेले काम समाधानकारक नसल्याचा दावा यावेळी श्री. नाईक यांनी करून ग्रामस्थांचे समाधान होईल असे काम करण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूपेंद्र मोंडकर यांच्याशी चर्चा करण्यात आली.
याबाबत श्री. नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील तोरसोळे गावच्या रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याचे सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित सुमारे २० टक्के काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. पूर्ण झालेला रस्ता काही ठिकाणी खचल्याचे तोरसोळे येथील काही ग्रामस्थांचे म्हणणे होते. यासाठी ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री. मोंडकर यांच्यासमवेत खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरून अवजड वाहतूक जास्त होत असल्याने हा रस्ता चांगला व्हावा, बऱ्याच वर्षानंतर या रस्त्याचे काम होत असल्याने ते काम चांगले व्हावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच खड्डे पडलेल्या ठिकाणी त्याची डागडुजी करून देण्याची आवश्यकता आहे. रस्त्यालगत वाढलेली झाडी देखील तोडावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
या मागण्यांकडे श्री. नाईक आणि श्री. जोगल यांनी संबधित विभागाचे लक्ष वेधून ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचे सुचवले. तसेच काही ग्रामस्थांचे झालेल्या नुकसानीची मागणी करण्यात आली. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्‍वासन संबधित विभागाने दिले असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. यावेळी उपतालुका प्रमुख दादा सावंत, युवासेना उपतालुकाप्रमुख स़चिन पवार, सुहास पवार, शुभ्रा मेस्त्री, योगिता सावंत, अजित पवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com