-विजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू
-rat१२p३०.jpg ः
२५N७०१७०
स्वरांगी गिजम
------
शाळकरी मुलीचा
विजेचा धक्याने मृत्यू
राजापूर, ता. १२ ः तालुक्यातील धाऊलवल्ली येथील स्वरांगी संदीप गिजम (वय १३) या मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. संदीप गिजम यांचे कुटुंबीय शेतातील कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यांची मुलगी स्वरांगी ही एकटीच घरी होती. या वेळी घरातील पंख्याच्या उघड्या वायरला तिचा स्पर्श झाला आणि तिला विजेचा तीव्र धक्का बसला; मात्र घरी कोणीच नसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शेतातील कामे आटपून कुटुंबीय घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र तत्पूर्वीच ती मृत झाली होती. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.