-...आणि खाडीपर्यटनाला व्यावसायिक रुप आले

-...आणि खाडीपर्यटनाला व्यावसायिक रुप आले

Published on

- rat१३p५.jpg -
२५N७०३१३
पावस ः गोळप कट्टाच्या ६७व्या कार्यक्रमात संजीव लिमये यांची प्रकट मुलाखत घेताना अविनाश काळे.
---
...आणि खाडीपर्यटनाला व्यावसायिक रूप आले
संजीव लिमये ः गोळपकट्टाच्या ६७व्या कार्यक्रमात प्रकट मुलाखत
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १३ ः खाडीतील पर्यटन सुरू करण्याचे ठरवले, हळूहळू चांगला प्रतिसाद मिळाला आणि व्यावसायिक रूप प्राप्त झाले. आजूबाजूच्या होडी मालकांनाही काम मिळू लागले. पर्यटकांची पावले खाडी पर्यटनासाठी कर्ले गावाकडे वळू लागली, अशी माहिती कर्ले गावातील सुशेगाद जलविहार व हॉलिडे होमस्टेचे संजीव लिमये यांनी दिली.
गोळपकट्टाच्या ६७व्या कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत अविनाश काळे यांनी घेतली. या वेळी लिमये म्हणाले, १५ जानेवारी २०१० ला सूर्यग्रहण होते. याच दिवशी गोगटे कॉलेजचा नेचर क्लब व मुलांना सोबत घेऊन होडीतून ग्रहण दर्शनाची पहिली खाडी पर्यटनाची सहल केली. खाडी पर्यटनाला नवा आयाम दिला. आजपर्यंत संगीतमैफल, गेट टुगेदर, अभ्यास सहल, इन्शुरन्स कंपनी ट्रेनिंग प्रोग्राम, फोटोशूट, डोहाळे जेवण, भिशी ग्रुप, आकाशदर्शन, कांदळवन सफारी इत्यादी माध्यमातून हजारो पर्यटक येऊन गेले. त्यांना पक्षी, कांदळवन, स्थलांतरित पक्षी, सूर्योदय, सूर्यास्त, मच्छीमारी, जुवे बेट, चिंचखरी दत्तमंदिर आदी गोष्टी अनुभवता येतात. १० ते ४० लोकांना एकावेळी नेतो. एक होडी नाहीतर दोन होडीमधून पर्यटकांना नेतो. स्थानिकांना काम मिळावे यासाठी होड्या भाड्याने घेतो. स्वतः किंवा मुलगा प्रत्येकवेळी बरोबर असतो. पर्यावरणाला धोका पोचणार नाही, याची काळजी घेतो. सात वर्षांपूर्वी हॉलिडे होम सुरू केले. मुलाने हॉटेल मॅनेजमेंट केले आहे. तो आणि त्याची पत्नी याची व्यवस्था पाहते, असे लिमये म्हणाले.

ग्रंथालयातही कार्यरत
कर्ले येथे सहयोग ग्रंथालय सुरू केले. आता पंचवीस वर्ष पूर्ण होतील. ग्रंथालय ब वर्ग आहे. हजारो पुस्तके आहेत. अ वर्गाकडे वाटचाल सुरू आहे. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय कुवारबावचासुद्धा संस्थापक सदस्य आहे, असे सांगत मी पुस्तकांतही रमतो, असे लिमये म्हणाले.

चौकट २
रत्नदुर्ग माउंटेनिअर्समध्ये कार्यरत
लिमये म्हणाले, १९७५ ते ८०च्या दरम्यान आवड असल्याने अनेक ट्रेक केले होते. नंतर भैय्या वणजू यांच्या सह्याद्री माउंटेनिअर्सचा रॉक क्लायम्बिंगचा कॅम्प केला. छत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप केळकर, शेखर मुकादम, राजू नेने, नेत्रा राजेशिर्के, सतीश रानडे, शिरीष सोहोनी आणि मी असे मिळून झरी विनायकाच्या साक्षीने रत्नदुर्ग माउंटेनिअर्सची स्थापना केली. अनेक वर्ष भाट्ये सुरूबन येथे कॅम्प घेतले. मुले-मुली, युवक, पालक यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळायचा.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com