ःपेठमाप-मुरादपूर ब्रिजजवळील खड्ड्यांवर शिवसेनेचा ''भराव''!

ःपेठमाप-मुरादपूर ब्रिजजवळील खड्ड्यांवर शिवसेनेचा ''भराव''!

Published on

rat१३p६.jpg -
P२५N७०३१४
चिपळूण- पेठमाप-मुरादपूर उड्डाणपुलाजवळी खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भराव टाकल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला.
------
‘पेठमाप-मुरादपूर’ येथील
खड्ड्यांवर शिवसेनेचा ‘भराव’!
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : पेठमाप–मुरादपूर उड्डाणपूलजवळील सेवारस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून एकेक फुटाचे खड्डे पडले होते. यामुळे पेठमाप, मुरादपूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता अक्षरशः धोकादायक झाला होता. या समस्येकडे लक्ष वेधून घेऊन शिवसेना उपशहरप्रमुख विकी लवेकर यांनी आज थेट रस्त्यावर उभं राहून खासगी डंपरचालकांना थांबवत रोडवर भराव टाकण्याचे काम करून घेतले. चिपळूण नगर पालिकेच्या जेसीबीच्या मदतीने खड्ड्यांमध्ये गाळ पसरवण्यात आला. या वेळी सतीश सावंत यांचेही विशेष सहकार्य लाभले. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली होती की, अपघाताची भीती वाटत होती; पण आजचे काम पाहून दिलासा वाटतो. लवेकर यांनी सांगितले, ‘पुढील दोन दिवसांत पेटमाप-भाटण ते फरशी ब्रिज डीपी रोडवरील खड्डेही बुजवण्यात येणार आहेत.’ या तातडीच्या कृतीबद्दल पेठमाप आणि मुरादपूर ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि हे खरे जनसेवेचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com