पुलाच्या अर्धवट कामामुळे त्रास
पुलाच्या अर्धवट
कामामुळे त्रास
दोडामार्ग ः बोडदे-गावठाणवाडी केळीचे टेंब येथील लहान पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. या पुलाचे काम आठ दिवसांत करावे; अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य महादेव गवस, सामाजिक कार्यकर्ते शंकर परब, गणपत गवस, रमेश गवस यांनी दिला आहे. बोडदे-गावठाणवाडी येथे शेळीच्या भागातून ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी ओहोळावर लहान पूल मंजूर झाला. या पुलाचे काम मार्चमध्ये सुरू केले. पण, मे महिन्यात अचानक पडलेल्या पावसामुळे राहिले आहे. त्यामुळे या भागात चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाळ्यात हा भाग पूर्णपणे खराब होऊन ग्रामस्थांना प्रवास करणे जिकिरीचे होणार आहे. या पुलाचे काम ठेकेदाराने त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आठ दिवसांत दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
------
कलंबिस्त स्कूलला
संगणक संच भेट
सावंतवाडी ः शाळेशी असणारे ऋणानुबंध जपत, सेवाभावी वृत्तीने कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक वर्ष २००४-०५ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत, आर्थिक सहयोगातून प्रशालेला संगणक संच भेट दिला. तसेच प्रशालेविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. यात नूतन म्हाडगूत, वीणा सावंत, सीमा नेवगी, शांती पास्ते, सुप्रिया जाधव, विलास तावडे, अरुण पास्ते, सचिन धोंड, प्रमोद तावडे, प्रदीप तावडे, विनोद पावसकर, स्वप्नील गावडे, सुरेखा पास्ते, नमिता पास्ते, दीपिका सावंत, भारती पास्ते, सुप्रिया शेडगे, शीतल परब, अश्विनी लाड, सचिन राऊळ, सुरेंद्र पास्ते, तुळशीदास घोगळे, सोनम सावंत, रघुवीर कविटकर, ज्ञानेश्वर सावंत, शिल्पा सावंत या विद्यार्थ्यांनी सहयोग दिला. मुख्याध्यापक अभिजीत जाधव, लिपीक रविकमल सावंत आदी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ यांनी आभार मानले.
.......................
कणकवलीत २२ ला
गुणगौरव सोहळा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजातर्फे समाजातील दहावी, बारावी व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव २२ जूनला आयोजित केला आहे. हा समारंभ कणकवली येथील भालचंद्र महाराज आश्रमात दुपारी तीन वाजता होणार आहे. समारंभासाठी नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी व परीट संघटनेच्या सर्व पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला परीट समाज संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, युवक प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, युवक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, महिला जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व परीट ज्ञातीबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कार्यकारिणी सचिव अनिल शिवडावकर व अध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले आहे.
--
मालवणमध्ये उद्या
रिल्स मेकर्स सभा
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने आणि लकी कांबळी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील युट्यूबर्स व रिल्स मेकर्स यांची विचार सभा रविवारी (ता.१५) सकाळी १०.३० वाजता येथील विजया बेकरी येथे आयोजित केली आहे. सभेत पावसाळी पर्यटन वाढीसाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर चर्चा करून अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम आखला जाणार आहे. तरी संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण व्यापारी संघाचे सहकार्यवाह अभय कदम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.