असोसिएशनची वार्षिक सभा

असोसिएशनची वार्षिक सभा

Published on

rat१३p३.jpg-
P२५N७०३११
पुणे : बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित अधिकारी, कर्मचारी सभासद.
------
बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स
असोसिएशनची वार्षिक सभा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ः बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन पुणे युनिटची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभागृहात उत्साहात झाली. सभेमध्ये संघटनेच्या गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा, आर्थिक विवरणपत्रांची मांडणी, कार्यकारिणीने सुचवलेले ठराव तसेच सदस्यांच्या सूचनांवर सकारात्मक चर्चा झाली.
सभेसाठी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव नीलेश पवार, अध्यक्ष नागेश्वर, श्वेतांग त्रिवेदी, उपाध्यक्ष महेंद्र धोंडसे, पुणे विभागाचे अध्यक्ष अमोल सांगळे, महासचिव प्रमोद शिंदे, बँक ऑफ इंडिया पुण्याचे मुख्य महाप्रबंधक प्रमोद कुमार द्विबेदी, क्षेत्रीय प्रबंधक संजय कदम, नरेंद्र देवरे आणि चंद्रशेखर मंत्री यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सुमारे १२०० सदस्य उपस्थित होते. यातून संघटनेचे महत्त्व आणि अधिकाऱ्यांमधील ऐक्य यांचे प्रभावीपणे दर्शन झाले.
---
rat१३p१.jpg-
P२५N७०३०७
रत्नागिरी : अभ्युदयनगर येथील संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात यलो बेल्ट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
---
तायक्वांदो केंद्रात प्रमाणपत्राचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ः यलो बेल्ट प्रमाणपत्राच्या वितरणामुळे मुलांना आणखी मेहनत करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे, असे प्रतिपादन डॉ. उज्ज्वला कांबळे यांनी केले. प्रशिक्षक संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शहरातील अभ्युदयनगर बहुउद्देशीय सभागृह येथे तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. येथे परिसरातील विद्यार्थी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. नुकत्याच झालेल्या यलो बेल्ट परीक्षेमध्ये या प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये दूर्वा कवितके, शिवाज्ञा पवार, उत्कर्ष जैन, शौर्य घाणेकर आणि नायशा कांबळे या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी मुलांची पुमसे प्रात्यक्षिके घेण्यात आली. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्यादृष्टीने हा खेळ उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया सर्व पालकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com