कुडाळ ‘एसटी’चे प्रश्न सोडविण्यास सक्षम
70586
कुडाळ ‘एसटी’चे प्रश्न सोडविण्यास सक्षम
आमदार नीलेश राणे ः पाच नव्या ‘लालपरीं’चे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः अधिक गतिमान असणारे राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य माणसे व जनता यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर कसे असते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नवीन अद्ययावत दाखल झालेल्या ‘लालपरी’ होय. भविष्यात कुडाळ आगाराचे जे मूलभूत प्रश्न आहेत, ते प्राधान्याने सोडविण्यासाठी महायुती सक्षम आहे, असे प्रतिपादन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांनी आज कुडाळ आगारात दाखल झालेल्या नवीन पाच नव्या बसच्या लोकार्पणप्रसंगी केले केले.
एसटी महामंडळाकडून राज्यात नवीन बस देण्यात आल्या. सिंधुदुर्ग विभागातही आगारांना दोन महिन्यांपूर्वी या बस दाखल झाल्या होत्या. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य आगार असलेल्या कुडाळमध्ये या नवीन बस नव्हत्या. यासाठी आमदार राणे यांच्या मागणीनुसार अखेर कुडाळ एसटी आगारात नव्या पाच बस दाखल झाल्या. आमदार राणे यांनी या बस कुडाळ आगाराला मिळाव्यात, म्हणून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्या मागणीला अवघ्या पंधरा दिवसांत यश आले आहे. या बसचा लोकार्पण सोहळा आमदार राणे यांच्या हस्ते झाला.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, एसटी विभागाचे तांत्रिक विभागप्रमुख सुजित डोंगरे, कुडाळ आगारप्रमुख रोहित नाईक, कुडाळ शहरप्रमुख ओंकार तेली, नीलेश तेंडुलकर, रेवती राणे, वैशाली पावसकर, कुडाळ शहरप्रमुख संजय भोगटे, गटनेते विलास कुडाळकर, ज्येष्ठ नागरिक नारायण तळेकर, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, मोहन सावंत, देवेंद्र सामंत, अरविंद करलकर, रोशन तेंडुलकर, चेतन पडते, सचिन पालकर, राजेश सिंगनाथ, श्रीनाथ आंबेसकर, दिनेश शिरवलकर आदी उपस्थित होते.
दादा साईल म्हणाले, ‘अवघ्या पंधरा दिवसांत आमदार राणे यांच्या माध्यमातून कुडाळ आगारात पाच नव्या ‘लालपरी’ दाखल झाल्या. धडाकेबाज निर्णय घेणारे आमदार राणे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत.’ आगारप्रमुख रोहित नाईक यांनी प्रवाशांना नवीन सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी कुडाळ आगाराच्या वतीने तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार राणे यांचा सत्कार करण्यात आला. कुडाळ आगाराचे श्रीनाथ आंबेसकर यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश शिरवलकर यांनी आभार मानले.
----------
वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू!
आमदार राणे म्हणाले, ‘महायुतीच्या माध्यमातून काम करताना संपूर्ण महाराष्ट्रात कुडाळ बसस्थानक अव्वलस्थानी कसे राहील, या दृष्टिकोनातून काम करणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब या सेवाभावी संस्था तसेच इतर संस्था व नागरिकांना अभिप्रेत काम करणार आहे. कुडाळ-पिंगुळी रस्त्याचे रुंदीकरण होण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. रस्त्याकडेला बसणाऱ्या दुकानदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या जागेचा मोबदला घेऊन निर्णय घेतला जाईल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.