‘सेवांगण’च्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य
70732
‘सेवांगण’च्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य
श्याम चव्हाण ः कट्टा येथे गुणगौरव, शिक्षण निधी वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः कट्टा सेवांगणच्या अनेक शैक्षणिक उपक्रमांचा मी सुद्धा लाभ घेतला आहे. गेली २५ वर्षे कट्टा सेवांगणने परिसरात शैक्षणिक गुणवत्ता वाढविली आहे. या संस्थेचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. या संस्थेला माझे सर्व प्रकारचे सहकार्य या संस्थेला राहील, अशी ग्वाही मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी गुणवंत सत्कार व शिक्षण निधी वितरण कार्यक्रमात बोलताना दिली.
साने गुरुजी पुण्यतिथीचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सेवांगण कट्टातर्फे गरीब मुलांना शिक्षण निधी वितरण व कट्टा दशक्रोशीतील हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मालवणचे गटविकास अधिकारी चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमास इस्त्रोचे सेवानिवृत अधिकारी किशोर शिरोडकर, देविदास पवार, डॉ. हरीश परुळेकर, डॉ. सोमनाथ परब, बापू तळावेडकर, वैष्णवी लाड, शोभा म्हाडगुत, विद्या चिंदरकर, मनोज काळसेकर, श्रीधर गोंधळी, रिया जांभवडेकर, अदिती शृंगारे, सौ. परुळेकर, संगम चव्हाण, बाळकृष्ण नांदोसकर, दीपक भोगटे आदी उपस्थित होते.
श्री. पवार यानी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून ही गुणवत्ता यापुढेही टिकवा व आपले गाव व शाळा यांना विसरू नका, असे आवाहन मुलांना केले. माजी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी यांनी गुणवत्ता टिकवण्यासाठी शारीरिक तंदुरुस्त असणे महत्त्वाचे असून सर्वांनी योग्य आहार व आवश्यक निद्रा घेऊन निर्लेप आयुष्य जगावे, असे सांगितले. बालरोगतज्ज्ञ डॉ. परुळेकर यानी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून बॅ. नाथ पै सेवांगण सातत्याने राबवत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. श्री. शिरोडकर यांनी सेवांगणच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पालकांतर्फे उद्योजक मोहन गावडे यांनी मुलांना उच्च शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. दीपक भोगटे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. वैष्णवी लाड यांनी सूत्रसंचालन केले.
...............
विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
यावेळी देविदास पवार यांनी दिलेल्या देणगीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले. सर्व गुणवंतांना शैक्षणिक भेटवस्तू व अभिनंदन पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ५० गरीब मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.